Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! पुण्यातील ‘हे’ प्रसिद्ध मंदिर 15 डिसेंबरपासून राहणार बंद; कारण काय?

मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच घडत असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 10, 2025 | 06:54 PM
गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! पुण्यातील ‘हे’ प्रसिद्ध मंदिर 15 डिसेंबरपासून राहणार बंद; कारण काय?
Follow Us
Close
Follow Us:

श्री कसबा गणपती पुणेकरांचे आराध्यदैवत
श्रींच्या मूर्तीवर होणार शेंदूर कवच दुरुस्ती
प्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्यामुळे साधारण तीन आठवडे लागणे अपेक्षित

पुणे: ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री गणेश मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवारी दि.१५ डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच घडत असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला देवस्थानचे खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, आदी उपस्थित होते. विनायक ठकार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रीं च्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, म्हणून सध्या असलेले शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

शेंदूर कवच काढणे व त्या अनुषंगाने आवश्यक ती कामे ही सर्व प्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्यामुळे साधारण तीन आठवडे लागणे अपेक्षित आहे. कदाचित हा कालावधी कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो. मात्र याचा अंदाज प्रत्यक्ष काम सुरु झाल्यावरच येईल. इथून पुढे होणा-या कामाचा योग्य आढावा घेऊन मंदिर लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करण्याचा व्यवस्थापन समितीची प्रामाणिक इच्छा असल्याचे या समितीकडून सांगण्यात आले.

मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व मार्गदर्शनाखाली कामकाज

शेंदूर कवच काढण्याकरीता विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ही प्रक्रिया विशेषतः श्रींच्या मुख्य रोजच्या पूजेच्या मूर्तीवर करण्यात येणार आहे.

Web Title: Pune famous kasba ganpati temple closed for devotees vermilion cover on idol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • lord ganesha
  • pune ganpati
  • pune news

संबंधित बातम्या

सनईच्या मंगल सुरावटींनी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात; किराणा घराण्याच्या…; PMP देणार विशेष सेवा
1

सनईच्या मंगल सुरावटींनी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात; किराणा घराण्याच्या…; PMP देणार विशेष सेवा

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
2

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत
3

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
4

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.