Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक

पुण्यासारख्या शहरात पती तसेच सासरच्या छळाला कंटाळून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहितांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 22, 2026 | 07:31 PM
छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक

छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात दोन विवाहितांच्या आत्महत्येच्या घटना
  • माहेरून पैशांची मागणी, घटस्फोटासाठी छळाचा आरोप
  • दोन्ही प्रकरणांत पतींना पोलिसांकडून अटक
पुणे : पुण्यासारख्या शहरात पती तसेच सासरच्या छळाला कंटाळून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहितांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रकरणात माहेरहून पैशांची मागणी तर, दुसऱ्या प्रकरणात विवाहाच्या १२ वर्षानंतर घटस्फोटाची सातत्याने मागणी करून छळ केल्याने आत्महत्या केल्याचे म्हंटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही घटनांतील पतींना अटक केली आहे.

 

पहिली घटना काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, ४१ वर्षीय सौमिता गौतम सावु (वय ४१, रा. हांडेवाडी) या विवाहितेने बाल्कनीतून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती गौतम विभुतीभुषण सावु (वय ४५) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दसऱ्याच्या दिवशी घडली असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सौमिता व गौतम यांचा २०१२ मध्ये विवाह झाला होता. ते हांडेवाडी परिसरात राहण्यास होते. सौमिता एका स्कूलमध्ये नोकरी करत होत्या. तर, पती देखील मोठ्या कंपनीत नोकरी करतो. त्यांना १४ वर्षांचा एक मुलगा आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कौटुंबिक वादविवाद सुरू होते. पती गौतम हा सौमिता यांना सातत्याने घटस्फोट द्यावा, अशी मागणी करत होता. तसेच, त्यावरून त्यांचा छळ करत होता. या छळाला कंटाळून सौमिता यांनी दसऱ्याच्या दिवशी (दि. २० ऑक्टोंबर) बाल्कनीतून खाली उडी मारून आपले आयुष्य संपविले. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप राऊत हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून

दुसरी घटना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. २३ वर्षीय विवाहिता प्रियंका सुरेश कांबळे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पती सुरेश शिवाजीराव कांबळे (वय २६, रा. वडगावशेरी) याला अटक केली आहे. सुरेश आणि प्रियंका यांचा २०२४ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांनीच पती सुरेश याने व सासू, नणंद व इतरांनी आपआपसात संगणमत करून तिला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तिला सतत टोचून बोलून तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. या छळाला कंटाळून प्रियंका हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अधिक सहाय्यक निरीक्षक वर्षा बांबे या करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील दोन्ही घटनांमध्ये विवाहितांनी आत्महत्या का केली?

    Ans: एका प्रकरणात माहेरून पैशांची मागणी करून छळ केल्याचा, तर दुसऱ्या प्रकरणात लग्नाच्या १२ वर्षांनंतर घटस्फोटाची मागणी करून छळ केल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: दोन्ही घटनांमध्ये संबंधित विवाहितांच्या पतींना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: या दोन्ही घटना कुठे घडल्या?

    Ans: या दोन्ही घटना पुणे शहरात घडल्या असून, संबंधित प्रकरणांत पोलिसांनी पतींना अटक केली आहे.

Web Title: An incident has occurred in pune where two married women died by suicide nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police Action
  • suicide news

संबंधित बातम्या

पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
1

पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच
2

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय
3

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय

पुणे जिल्ह्यातील शाळांना 5 नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टी; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती
4

पुणे जिल्ह्यातील शाळांना 5 नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टी; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.