
पुणे जिल्ह्यातील शाळांना 5 नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टी; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती
पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नव्या आदेशानुसार सुट्टीच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
सुरुवातीच्या शिक्षणात एआयची एन्ट्री
सध्याचे युग एआयचे आहे. सर्वजण आपल्या छोट्या-मोठ्या कामांसाठी एआयचा उपयोग करून घेत आहेत. मुले ‘एआय ट्यूटर’कडून शिक्षण घेत आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने गृहपाठ करत आहेत आणि प्रोजेक्टसाठीही याचीच मदत घेत आहेत.
FAQ :
पुणे जिल्ह्यात दिवाळी सुट्टी नक्की कधीपासून? 5 नोव्हेंबर की 2 नोव्हेंबर?
– राज्य शिक्षण विभागाचा अधिकृत GR – 2 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2026 – 13 दिवस आहे. पण पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांनी 5 नोव्हेंबरपासून सुट्टी जाहीर केली आहे.
शैक्षणिक कॅलेंडर नेमकं कसं?
– शैक्षणिक कॅलेंडरनुसार, पहिले सत्र : 15 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत. अधिकृत दिवाळी सुट्टी सोमवार 2 नोव्हेंबर ते शनिवार 14 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
शाळा आपल्या मनाने सुट्टी बदलू शकते का? नियम काय?
– नाही. माध्यमिक शाळा संहिता (Secondary School Code) नुसार, वर्षभरातील सर्व प्रकारच्या सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त नकोत. वर्षभरात किमान 230 दिवस शाळा भरलीच पाहिजे.