Pune Fire Department deployed personnel in Sant Dnyaneshwar Mauli palanquin ashadi wari 2025
Ashadhi Wari Solhla 2025 : पुणे – आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यनगरीत आगमन होत आहे. यासाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. पुणे पोलीस आणि प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येत वारकरी संप्रदाय सहभागी शहरामध्ये दाखल होत असतो. या अनुषंगाने पालखी सोहळ्यामध्ये आग वा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतीकरिता अग्निशमन दलाकडून दरवर्षी अग्निशमन वाहन पुणे ते पंढरपूर तैनात करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासाठी अग्निशमन दल देखील तयार झाले आहे.
यावर्षी देखील पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून एक अग्निशमन वाहन एक अधिकारी व सहा जवानांसह पथक काल आळंदीमध्ये दाखल होत पुढे पंढरपूर पर्यंत तैनात राहणार आहे. तसेच पुण्यनगरीत पालखीच्या आगमनावेळी विश्रांतवाडी चौक येथे येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन तर संगम पुलानजीक दिवंगत दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्रातील वाहन पुढे खंडोजीबाबा चौक रस्त्यावर एरंडवणा अग्निशमन केंद्रातील वाहन आणि भवानी – नाना पेठ येथे अग्निशमन मुख्यालयातील वाहन बंदोबस्तकरिता राहणार असून पालखी पुढे मार्गस्थ होताना हडपसर अग्निशमन केंद्रातील वाहन गाडीतळ येथे दाखल असणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे ते पंढरपूर मार्गस्थ पालखीत आग किंवा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे 8208956316, फायर इंजिन ड्रायव्हर राजू शेलार 9922426600, फायरमन अजितकुमार शिंदे 8805988039 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर “पालखीत वारकरी भाविकांसाठी आमचे अग्निशमन दल नेहमीच सज्ज असते. या गणवेशधारी सेवेमध्ये कर्तव्य बजावत असताना बंदोबस्त करीत माऊलींची सेवा करीत वारी पुर्ण करण्याचे वेगळेच समाधान मिळते.” अशा भावना पुणे पालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी कैलास तुकाराम शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील रस्त्यांमध्ये बदल
पालखीचा मार्ग असलेल्या रस्त्यांना जोडणाऱ्या १२४ ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. तर मुक्काम परिसरातील ३८ ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. तसेच या दोन्ही पालखी प्रास्थान मार्गावरील २३० ठिकाणी वाहतूक बंद केली. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जड वाहनांना ‘या’ चौकांपासून प्रवेश बंद