प्रभादेवी येथील अतिक्रमण कारवाई रोखण्यासाठी अश्विनी वैष्णव यांना फोन (फोटो - सोशल मीडिया)
प्रभादेवी रेल्वे परिसरात पुर्नवसन झाल्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये,अशी मागणी केली जात होती. स्थानिकांनी या कारवाईविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यासाठी मनसे नेते व शिवसेने नेते मैदानात उतरले होते. त्यांनीही ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे प्रशासनाकडून कारवाई थांबवली जात नव्हती. पण यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना फोन केल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये आणलेले सर्व जेसीबी परत गेले असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “रेल्वेची तोडक कारवाई आज सुरू झाली होती, ती आता थांबलेली आहे. या जागेमध्ये पन्नास-साठ वर्षांपासून राहणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू होती. मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांशी बोललो आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून कारवाई स्थगित केलेली आहे. यानंतर निर्माण विभाग आणि रेल्वेचा RNDविभाग मिळून पुनर्वसनाचे कायमचे धोरण करणार आहेत.”
पुढे ते म्हणाले, “पुनर्वसनाचे कायमचे धोरण राबवल्यानंतर सर्व लोकांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर होणार आहे. रेल्वे आणि राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय दोन्ही मिळून पुनर्विकासाचं धोरण करणार आहोत. यामुळे यांचा कायमचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल.”
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईकर मुंबईतच राहावा, मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या जागेमध्ये राहणाऱ्या लोकांचा पुनर्विकास / पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे, याचं धोरण तयार करतोय.” अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Ans: प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर कारवाई होणार होती.
Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाई स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Ans: शिंदे यांच्या माहितीनुसार, रेल्वे आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून पुनर्वसनाचे कायमस्वरूपी धोरण तयार करण्यात येणार आहे.






