Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro News: पुण्यात मेट्रो लाईनच्या बोगद्याला छिद्र ! घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार

भूमिगत बोगद्याचे मारक क्रमांक १५/५६, रिंग क्रमांक ४७१ याठिकाणी ६ इंच व्यासाचा खड्डा पडला गेला. खड्डा पडल्याने मेट्रो मार्गावर पाणी गळती झाली. यानंतर हा प्रकार समोर आला आहे

  • By anuradha sagar
Updated On: Mar 25, 2026 | 10:15 AM
Pune Metro News, Pune Metro, Pune Metro Tunnel Damage

Pune Metro News, Pune Metro, Pune Metro Tunnel Damage

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात मेट्रोच्या भूमिगत बोगद्यावर बोअरवेल मारताना बोगद्याच्या छताला छिद्र
  • संबंधित घरमालक धनंजय मोटे आणि कंत्राटदार जगताप यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
  • घराखालून मेट्रोचा मार्ग गेला आहे याची पूर्ण कल्पना असूनही, घरमालकाने निष्काळजीपणे बोअरवेलचे काम केल्याचे पोलीस तपासात समोर
Pune Metro News: शहरात मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग आलेला असताना एक सुरक्षिततेबाबत गंभीर बाबसमोर आली असून, भूमिगत मेट्रो बोगद्यावर बोअरवेल घेताना बोगद्यावर खड्डा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी संबंधित घरमालक व ठेकेदारावर गुन्हा नोंद केला आहे.

याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात धनंजय मोटे व ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक शंतनु गोरात्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. दि. १४ मार्च रोजी ही घटना घडली असून, हा प्रकार समोर आल्यानंतर सोमवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘सभापतींचा आदेश म्हणजे…’

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुणे मेट्रोच्या ऑपरेशन अँड मेंटेनेन्स विभागाचे (सिव्हील) संयुक्त महाव्यवस्थापक आहेत. दरम्यान, शहरात मेट्रोची भूमिगत कामे सुरू आहेत. दरम्यान, तक्रारदार यांना घराच्या खालून भूमिगत मेट्रो गेली आहे, याची कल्पना होती. तरीही त्यांनी निष्काळजीपणे बोरवेल घेण्याचे काम केले.

मेट्रोच्या मालमत्तेचे २ लाखांचे नुकसान; पोलिसात तक्रार

भूमिगत बोगद्याचे मारक क्रमांक १५/५६, रिंग क्रमांक ४७१ याठिकाणी ६ इंच व्यासाचा खड्डा पडला गेला. खड्डा पडल्याने मेट्रो मार्गावर पाणी गळती झाली. यानंतर हा प्रकार समोर आला आहे, पाणी येत – असल्याने मेट्रोकडून चौकशी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली, याप्रकरणी तक्रार दिली असून अधिक तपास खंडक पोलिस करत आहेत, शहरातील भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान झालेला हा मोठा निष्काळजीपणा मानला जात आहे.

Stock Market Today: ल्युपिन लिमिटेड आणि टेक महिंद्रासह आज ‘हे’ शेअर्स पालटणार तुमचं नशिब! 

ही मेट्रो शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान धावणार आहे. पण, थेट बोगद्याच्या वरच बोअरवेल मारले गेले. यामुळे बोगद्याचे नुकसान झाले, आणी पाणी गळतीही शुरू इझाली. बोरवेलमुळे नागरिकांच्या तसेच वैयक्तिक सुरक्षितेत धोका निर्माण करणारे कृत्य केले. मेट्रोच्या मालमतेचे २ लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

Web Title: Pune metro news hole pierces metro tunnel in pune incident occurs during residential borewell drilling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • metro news
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
1

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त
2

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
3

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट
4

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.