Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळातील विद्यार्थी अन् पालकांसाठी आनंदवार्ता; 24 शाळा बनणार ‘पुणे मॉडेल स्कूल, पालकमंत्री पवारांचा निर्णय

पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमधील शाळा अत्यानुधिक आणि सुसज्ज करण्यात येणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पासाठी एकूण 20 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 02, 2025 | 12:46 PM
Pune Model School in vadgaon maval by dcm ajit pawar political news

Pune Model School in vadgaon maval by dcm ajit pawar political news

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : पुण्यातील शाळांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील 24 शाळा लवकरच आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज ‘पुणे मॉडेल स्कूल’ (आदर्श शाळा) म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार आहे.  त्यासाठी एकूण 20 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.

या 24 शाळांमध्ये अत्यानुधिक सुविधा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यामध्ये नवीन वर्गखोल्या, प्रवेशद्वार, व्यासपीठ, पदपथ, हॅंडवॉश स्टेशन, शौचालये आणि संरक्षक भिंती अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामुळे वडगाव मावळमधील 24 शाळा या सुसज्य आणि सुविद्य होणार आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मावळ तालुक्यातील आदर्श शाळांची यादी व निधी

१) आढले बु : ९१.२१  कोटी
२) शिवणे : १०९.२२ कोटी
३) उर्से : ७७.०५  कोटी
४) ताजे : ४८.९०  कोटी
५) भोयरे : १५९.५९  कोटी
६) तुंग : ५६.७१  कोटी
७) सांगवडे : ९१.५०  कोटी
८) गोवित्री : ४९.३३ कोटी
९) वराळे : १००.०४  कोटी
१०) येलघोल : १९७.६१  कोटी
११) महागाव : १०.७७  कोटी
१२) नाणे : ८६.५० कोटी
१३) साते : ५५.४४ कोटी
१४) नायगाव : ५९.६६ कोटी
१५) खांडी : ८३.१७ कोटी
१६) कुसगाव : ७७.४४  कोटी
१७) माळेगाव खु. : ७९.८९  कोटी
१८) नवलाख उंबरे : ६६.१८ कोटी
१९) बुधवडी : १२२.२३  कोटी
२०) इंदोरी – १५०.२३  कोटी
२१) टाकवे : १४४.४०  कोटी
२२) कुसवली : ८५.५६  कोटी
२३) वारु :  ४०.४१  कोटी
२४) शिलाटणे : १६७.००  कोटी

या ऐतिहासिक शालेय विकास प्रकल्पामुळे मावळ तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात मोठी गुणवत्ता वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शिक्षण मिळण्यासाठी ही पायाभूत कामे अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. त्यामुळे अनेकांची पाऊले ही सरकारी शाळांकडे वळण्याची शक्यता आहे. या २४ शाळांच्या कामांसाठी आवश्यक निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली सर्व कामे नियमानुसार वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या प्रकल्पाबाबत माहिती देताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “ही केवळ शाळांची डागडुजी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साकारलेला एक शासकीय व सामाजिक संकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार! ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवणार आहे.” असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Pune model school in vadgaon maval by dcm ajit pawar political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • maval news
  • pune news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन
3

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
4

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.