Pune Mumbai Highway Car Accident Vadgaon Maval News
वडगाव मावळ : राज्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस अपघाताच्या वार्ता समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या टेम्पोवर जाऊन कार धडकली. या भीषण अपघातामध्ये कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.05) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर ब्राम्हणवाडी, साते येथे घडली.
ताविश जावेद अहमद (वय २४), राशीद सोहराब खान (वय २४ आदर्शनगर मोशी ता. हवेली) यांचा जागीच मृत्यू झाला तर दिलशाद नियाज खान (वय २५ रा. आदर्शनगर, मोशी), महम्मद शाहीद रिझवी (वय २४), झिशान कलाम शाहीद (वय २४), फैझान मुस्ताक खान(वय २४ रा. आदर्शनगर, मोशी) हे जखमी झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत खंडाप्पा बसराज हारकुडे (वय ३५ रा. ब्राम्हणवाडी, साते) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फैझान मुस्ताक खान हा चार चाकी (कार नं. एम एच १२/एक्सइ ५०८३) चालवत होता. परंतु भरधाव वेगात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभा असणारे आयशर टेम्पोच्या (एमएच ०४/एचवाय ३१७९) पाठीमागील बाजुस आदळली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक एस. ए. जावळे करत आहेत. आसपासच्या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यात वाहनफोडीचे सत्र सुरु
पुण्यातील बिबवेवाडीत टोळक्याने जुन्या वादातून ६० ते ७० वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी त्यांना गुडघ्यावर आणले अन् तोडफोड करणाऱ्यांना एकप्रकारे इशाराच दिला. पण, बिबवेवाडी शांत होत असतानाच गुन्हेगाराच्या भावाने दारूच्या नशेत लक्ष्मीनगर भागात २० ते २२ वाहनांचे खळखट्याक केले. लक्ष्मीनगरात तोडफोड सुरू असताना इकडे मध्यभागात अज्ञाताने वाहने फोडल्याची घटना घडली. सलग घडणाऱ्या वाहन तोडफोडीने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सयाजी संभाजी डोलारे (वय.२०, रा.लक्ष्मीनगर, येरवडा) याच्यावर येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रिक्षा चालकाने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,”डोलारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. बुधवारी मध्यरात्री भरपूर दारू प्यायला. नतंर धारधार हत्यार हातात घेऊन परिसरात जोरजोराने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आवाजाने काही लोक घराबाहेर आले. लोकांना पाहून आरोपीने हत्याराने रस्त्यावर उभारलेल्या वाहनांच्या काचा फोडायला सुरुवात केली. यामध्ये बारा रिक्षा, टेम्पो, दोन दुचाकी आणि जेसीबीच्या काचा फोडून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे लोकांनी घाबरून घरात जाऊन दारे बंद करून घेतली. रिक्षाची तोडफोड पाहून रिक्षा चालक बाहेर आल्यावर आरोपीने त्याच्यावर हत्याराने वार करून जखमी करून फरार झाला. येरवडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही चित्रीकरण तपासल्यावर डोलारेने हत्याराने वाहनांची तोडफोड करताना दिसून आला.