Photo Credit- Social Media ठाकरे गट फुटणार; 'ऑपरेशन टायगर' सक्सेस होणार
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या राजकारणात ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून “ऑपरेशन टायगर”ची चर्चा सुरू होती. मात्र, पक्षांतर बंदी कायद्यामुळे हे खासदार संभ्रमावस्थेत होते. या कायद्याच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ठाकरे गटातील नऊ पैकी सहा खासदारांचे विभाजन आवश्यक होते, त्यामुळे त्यांना मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला.
आता “ऑपरेशन टायगर” यशस्वी झाल्याचे बोलले जात असून, ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिंदे गट लवकरच ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. या सहा खासदारांचा शिंदे गटामध्ये लवकरच प्रवेश होणार असून, हे खासदार येत्या संसदीय अधिवेशनाआधी अधिकृतरित्या शिंदे गटात सामील होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘लाडक्या बहिणी’च्या केवळ प्रचारासाठी तीन कोटींची तरतूद; राज्य सरकारकडून निर्णय जारी
1. भविष्याची चिंता – महायुतीचे मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या राजकीय भविष्यासंदर्भात असुरक्षितता वाटत आहे.
2. विकासासाठी निधीचा अभाव – ठाकरे गटाच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठी आवश्यक असलेला निधी मिळवण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे त्यांना विकासकामे करणे कठीण जात आहे.
3. सत्तेचा फायदा – केंद्र आणि राज्य दोन्हीकडे महायुतीचे सरकार असल्याने त्याचा फायदा घेत खासदारांना अधिक विकासकामे करण्याची संधी मिळेल.
पाकिस्तानातील स्वित्झलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हॅलीचे आधी होते भारतीय नाव
4. शिंदे गटाला जनतेचा स्वीकार – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला जनतेने स्वीकारले आहे, त्यामुळे भविष्यातही त्यांच्यासोबत राहणे फायदेशीर ठरू शकते.
5. भाजपची साथ आणि विकासाची संधी – भाजपसोबत राहिल्यास केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी देखील ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल दिल्याचे सांगितले जात आहे. या अंतर्गत ठाकरे गटातील खासदार फोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच सहापैकी पाच खासदारांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याची पूर्ण तयारी झाली आहे. पण केवळ एका खासदारामुळे भाजपप्रवेश अडल्याचे सांगितले जात आहे. तर एका खासदार अद्याप ठामपणे निर्णय घेऊ शकत नाहीये. पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ नये म्हणून नऊ पैकी सहा खासदार फुटणे आवश्यक आहे. अन्यथा या फुटीर गटांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. पक्षांतर बंदी कायद्यातून वाचायचे असेल तर सह खासदारांनी फुटणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) ला धक्का देण्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय केले आहे. दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (पुणे – कसबा जागा) आणि शिवसेनेचे (यूबीटी) माजी आमदार महादेव बाबर (पुणे – हडपसर जागा), माजी आमदार सुभाष बने (रत्नागिरी – संगमेश्वर जागा), माजी आमदार गणपत कदम ( माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (रत्नागिरी- राजापूर जागा), माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (पुणे- कोथरूड जागा) आणि विद्यमान आमदार यांच्यासह महाविकास आघाडीचे काही मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत.