Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर पुणे महापालिका ‘ऍक्शन मोड’वर; सुरु केलीये अशी कारवाई…

महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर (Illegal Hoarding) जोरदार कारवाई सुरु झाली असून, बुधवारी 29 तर गुरुवारी 15 होर्डिंग उतरविण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाने (Pune Corporation) कळविली आहे. तसेच होर्डिंगच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलीटीचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 20, 2023 | 08:39 PM
पुण्यात होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर पुणे महापालिका ‘ऍक्शन मोड’वर; सुरु केलीये अशी कारवाई…
Follow Us
Follow Us:

पुणे : महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर (Illegal Hoarding) जोरदार कारवाई सुरु झाली असून, बुधवारी 29 तर गुरुवारी 15 होर्डिंग उतरविण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाने (Pune Corporation) कळविली आहे. तसेच होर्डिंगच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलीटीचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे महापालिका खडबडून जागी झाली आहे. अनधिकृत होर्डिंगवर जोरदार कारवाई सुरु केली आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंगची संख्या अधिक आहे. त्याभागात कारवाई सुरु करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी 29 होर्डिंग उतरविले गेले. तर गुरुवारी ही कारवाई सुरु होती. दुपारपर्यंत पंधरा होर्डींग उतरविण्याचे काम सुरु होते, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार हे देखील या कारवाईवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. कारवाई विषयी खेमणार म्हणाले, ‘अनधिकृत होर्डींग उतरविण्याची कारवाई थांबलेली नाही. ती सातत्याने सुरु आहे. पावसाळा येऊ घातला आहे. या कालावधीत जोरदार वारे वाहून होर्डिग कोसळू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

तसेच अधिकृत होर्डींगच्या मालकांना त्याचे स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी करून घेण्यास सांगितले. पुढील 15 दिवसांत त्यांनी हे काम करणे अपेक्षित आहे. अन्यथा पुढील कारवाई केली जाणार आहे. आम्हाला संशयास्पद वाटणाऱ्या स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी अहवालाची फेर तपासणी आम्ही करून घेणार आहोत.’

एका मंत्र्यामुळे कारवाई थांबली होती?

आकाशचिन्ह परवाना विभागाने सुरु केलेल्या कारवाईमुळे जाहिरात व्यावसायिकांनी एका मंत्र्याची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. संबंधित मंत्र्याने कारवाई थांबविण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते, अशी चर्चा रंगली आहे. परंतु, पिंपरी चिंचवड येथील घटनेनंतर मात्र महापालिकेने जोरदार कारवाई सुरु केली आहे.

Web Title: Pune municipal corporation take action on illegal hoarding nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2023 | 08:39 PM

Topics:  

  • Illegal Hoarding
  • maharashtra
  • Marathi News
  • Pune
  • Pune Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख
1

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद
2

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी
3

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

CBSE Marksheet Issue: सीबीएसई बोर्डाच्या अजब कारभारामुळे विद्यार्थ्याच्या भविष्यावर संकट; नेमका प्रकार काय?
4

CBSE Marksheet Issue: सीबीएसई बोर्डाच्या अजब कारभारामुळे विद्यार्थ्याच्या भविष्यावर संकट; नेमका प्रकार काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.