Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moshi Building Collapse: मोशी इमारत दुर्घटने प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

Moshi Building Collapse: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध स्तरांवर चौकशी आणि प्रशासकीय कारवाईला गती दिली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 14, 2026 | 10:31 AM
Moshi Garbage Depot Accident, PCMC Compensation Moshi,

Moshi Garbage Depot Accident, PCMC Compensation Moshi,

Follow Us
Follow Us:

Moshi Building Collapse:  पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात झालेल्या दुमजली इमारत दुर्घटनेप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनेच्या चार दिवसांनंतर पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा कार्यभार काढून घेतला आहे. संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्या भूमिकेचाही प्रथमदर्शनी तपास सुरू असून तपासाच्या निष्कर्षांनुसार त्यांच्याविरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ८ जुलैला सकाळच्या सुमारास ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने इमारत जमीनदोस्त झाली. या अपघातात जवळपास १८ -२० जण इमारतीखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला, त्यानंतर सोमवारी (13 जुलै) शोधकार्य पूर्ण झाले.

Pune Police: पुणे पोलीस दलात ३५ टक्के पदे रिक्त; पोलीस अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण

पूर्णत्वाचा दाखला नसतानाही वरचे मजले वापरात?

या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या तपासादरम्यान दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) देण्यात आला नसल्याची बाबही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने विभागीय आयुक्त शीतल तेली यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती दुर्घटनेची कारणे, जबाबदारी आणि प्रशासकीय त्रुटींची सखोल चौकशी करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध स्तरांवर चौकशी आणि प्रशासकीय कारवाईला गती दिली आहे. महापालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांव्यतिरिक्त इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्वतंत्र चौकशी यंत्रणा नियुक्त केली आहे. या समितीला एका महिन्यात प्राथमिक अहवाल आणि दोन महिन्यांत अंतिम चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Pune Crime: भिंतीला भगदाड… गॅसकटरने लॉकर फोडला; पुण्यातील सराफी पेढीत लाखोंची धाडसी चोरी

कंत्राटदार कंपनीवरही कारवाईची शक्यता

दुर्घटनाग्रस्त इमारतीचे काम करणाऱ्या ‘अँटोनी लारा रिन्युएबल’ या कंत्राटदार कंपनीवरही कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दुर्घटनेसाठी कंपनी जबाबदार असल्याचा आरोप होत असून, तपासाच्या आधारे संबंधित कंपनीविरोधात पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. सुरुवातीला कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तपासातील नव्या घडामोडींनंतर महापालिका प्रशासनाने कारवाईच्या दिशेने पावले उचलल्याचे समोर येत आहे

 

 

 

Web Title: Pune news moshi building collapse pcmc commissioner action against sanjay kulkarni yogesh alhat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • building collapse
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
1

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका
2

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
3

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.