pune sassoon condition
पुणे : पुण्यातील शासकीय रुग्णालय असलेले ससून रुग्णालय हे नेहमी चर्चेचे कारण ठरले आहे. मागील अनेक महिन्यांपासून विविध क्राईम केससंबंधित संशयाची सुई ससूनवर ठेऊन थांबली आहे. यामध्ये ललित पाटील प्रकरण असो किंवा पोर्श अपघात प्रकरण असो. यामुळे ससून चांगलेच चर्चेत आले आहे. या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पुणे शहराबरोबरच जवळील गावांमधून देखील रुग्ण येत असतात. मात्र या रुग्णालयामध्ये प्रचंड अस्वच्छता आणि ढिसाळ कारभार याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शेअर केले आहे.
ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे त्यांच्या आक्रमक कार्य पद्धतीमुळे ओळखले जातात. आता त्यांनी ससून रुग्णालयाला निशाण्यावर धरले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर रुग्णालयातील अस्वच्छतेचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोमध्ये रुग्णाच्या बेडवर रक्त वाहत असून तसाच रक्ताच्या थारोळ्यात त्या रुग्णाला ठेवण्यात आले आहे. तसेच जमिनीवर देखील सगळीकडे रक्त पडलेले आहे. तसेच रुग्णालयातील टॉयलेटची देखील अतिशय बिकट आणि अस्वच्छ अवस्था आहे. कचरा पेटी देखील व्यवस्थित नसून रुग्णांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत वसंत मोरे यांनी ससून प्रशासनाला प्रश्न दिले केले आहेत.
काय म्हणाले वसंत मोरे?
सोशल मीडियावर पोस्ट करताना वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, ‘हे फोटो आहेत स्वतःला स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पुण्यामधील ससून हॉस्पिटलच्या एका इमर्जन्सी विभागाचे, आमचे पुणे स्टेशन विभागातील शाखाप्रमुख अनिल परदेशी यांनी स्वतः हा सर्व प्रकार उघडकीला आणला आहे म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शहराध्यक्ष, नगरसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ससून रुग्णालयाचे प्रमुख एकनाथ पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. या विभागाची स्वच्छता ठेवण्यासाठी 24 कर्मचारी असताना या भागाची ही दुरावस्था झालेली आढळून आली. म्हणून त्या सर्व कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसात ससून रुग्णालयात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा वसंत मोरे व ठाकरे गटाने दिला आहे.