Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vadgaon Maval News: १२ सप्टेंबरला वडगाव मावळ न्यायालयात ‘राष्ट्रीय लोकअदालत’; प्रलंबित प्रकरणे मिटवण्याची सुवर्णसंधी

ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवावयाची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयाशी किंवा वडगाव मावळ विधी सेवा समितीशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 06, 2026 | 04:30 PM
Vadgaon Maval News: १२ सप्टेंबरला वडगाव मावळ न्यायालयात ‘राष्ट्रीय लोकअदालत’; प्रलंबित प्रकरणे मिटवण्याची सुवर्णसंधी
Follow Us
Follow Us:
  • वीज व पाणी बिलांची थकबाकी देयके, बँक कर्ज वसुली प्रकरणे, दिवाणी व कौटुंबिक वाद.
  • चेकमार्क (138 NI Act) प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई दावे (MACT).
  • मालमत्ता विवाद, कामगार/कर्मचारी नुकसानभरपाई, तडजोडयोग्य दिवाणी व फौजदारी गुन्हे.
 

Pune News : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, वडगाव मावळ येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा जलद, कमी खर्चात आणि सामंजस्याने निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, मावळ तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विविध प्रकारच्या तडजोडयोग्य प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये वीज व पाणी बिलांची देयके, बँक कर्ज वसुलीची प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक वाद, मालमत्ता विवाद, कर्मचारी नुकसानभरपाईची प्रकरणे तसेच तडजोडयोग्य दिवाणी व फौजदारी स्वरूपातील प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात येणार आहे.

Pune Voter List SIR Drive: पुण्यातील तब्बल ११ लाख मतदारांची

लोकअदालतीत प्रकरण निकाली निघाल्यास संबंधित पक्षकारांना न्यायालयीन शुल्क परत मिळण्याची कायदेशीर तरतूद असून, कमी खर्चात, कमी वेळेत आणि परस्पर सामंजस्यातून न्याय मिळण्याचा लाभही मिळतो. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ आणि खर्चाची बचत होऊन दोन्ही पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण तोडगा निघण्यास मदत होते.

याशिवाय, लोकअदालतीस प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पक्षकारांसाठी दृकश्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) प्रणालीद्वारे सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरगावी असलेल्या किंवा इतर कारणांमुळे न्यायालयात उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांनाही या लोकअदालतीचा लाभ घेता येणार आहे.

मोठी बातमी ! पीक कर्जासाठी CIBIL ची अट नाही; सर्व बँकांना RBI च्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश

ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवावयाची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयाशी किंवा वडगाव मावळ विधी सेवा समितीशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील नागरिकांनी दि. १२ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घेऊन आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायालय, वडगाव मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Web Title: Pune news vadgaon maval court national lok adalat 12 september 2026 case settlement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • pune news
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
1

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
2

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
3

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
4

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.