Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला

Purandar Airport : भूसंपादनापूर्वी जमिनीवर नाव असलेल्या सर्व कायदेशीर खातेदारांची संमती आवश्यक आहे. मात्र, हक्काच्या वादांमुळे सर्व खातेदार एकत्र येऊन संमती देण्यास तयार नाहीत. बहीण-भाऊ, चुलते आणि इतर वारसदारांमध्ये जमिनीच्या वाटणीवरून आणि मोबदल्याच्या हिश्श्यावरून वाद सुरू झाले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 27, 2026 | 04:15 PM
Purandar Airport, Saswad News, Land Acquisition Purandar

Purandar Airport, Saswad News, Land Acquisition Purandar

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादनादरम्यान सासवड परिसरात कौटुंबिक वाद तीव्र
  • ७/१२ उताऱ्यावरील सर्व वारसदारांची संमती मिळवणे प्रशासनासाठी ठरतेय कठीण
  • बहीण, भाऊ आणि चुलत्यांमधील जमिनीचे वाद तहसील ते न्यायालयापर्यंत पोहोचले
Purandar Airport Land Acquisition Dispute: पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प जाहीर झाल्यापासून परिसरात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. एका बाजूला भूसंपादन वेगाने सुरू असले, तरी संपादनापूर्वी जमिनीच्या ७/१२ (सातबारा) उताऱ्यावरील सर्व खातेदारांची संमती मिळवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

अनेक कुटुंबांत बहीण, भाऊ, चुलते, आत्या यांच्यात जमिनीच्या हक्कावरून तीव्र वाद सुरू असून हे प्रकरण तहसील, उपविभागीय अधिकारी (प्रांत), जिल्हाधिकारी आणि न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. या वादावर वेळेत तोडगा काढण्याऐवजी ‘तारीख पे तारीख’ देण्याचा खेळ सुरू झाल्याने महसूल अधिकारी चांगलेच लखपती झाले आहेत, तर दुसरीकडे रक्ताच्या नात्यांमधील दुरावा अधिकच वाढला आहे.

LPG Connection New Rule: कधीपासून मिळणार एलपजी सिलेंडरचे नवे कनेक्शन, सरकारने दिली अपडेट

७ गावांमध्ये भूसंपादनाच्या प्रक्रियेला आला वेग

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी आणि पारगाव अशा ७ गावांमध्ये विमानतळ प्रकल्पासाठी जमीन संपादन केली जात आहे. यासाठी स्वतंत्र महसूल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून, तक्रारी नसलेल्या शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे घेऊन त्यांच्या बैंक खात्यावर त्याच दिवशी थेट मोबदला वर्ग केला जात आहे. त्यामुळे सासवड येथील प्रशासकीय इमारतीत शेतकऱ्याऱ्यांची मोठी वर्दळ दिसत आहे. ज्यांचे सातवारे निर्विवाद आहेत, अशा शेतकऱ्यांनी मोबदल्याच्या रकमेतून नवीन वाहने, शेतजमीन, दुकाने, सोने-दागिने आणि मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यासाठी अनेक तरतुदी झाल्या आहेत,

कायदेशीर कोंडी आणि सासुरवाडीची अडवणूक

विमानतळाच्या मोबदल्यावरून नातेवाईक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. “मला ठरलेला हिस्सा दिला नाही तर मी संमती देणार नाही” किंवा “जमत असेल तर एवढेच घे, नाहीतर न्यायालयात जा”, अशा धमक्या एकमेकांना दिल्या जात आहेत. अनेक प्रकरणांमध्ये जावयांनीही सासुरवाडीच्या जमिनीतील वाट्यासाठी अडवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत. एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी भूसंपादनाच्या संमतीपत्रावर कायदेशीर हरकती नोंदवून प्रक्रिया लांबवली जात आहे.

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला

साखळी पद्धतीने लाखोंचे व्यवहार

संमतीपत्रावरील हरकती दूर करण्यासाठी आणि निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी मध्यस्थांच्या मदतीने अधिकाऱ्यांपर्यंत लाखोंची रक्कम पोहोचवली जात आहे. ही देवाणघेवाण थेट न होता साखळी पद्धतीने केली जात असल्याने तक्रारींची अधिकृत नोंद होत नाही. जमिनीचे मूल्यांकन वाढवून देण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी उघडपणे सौदेबाजी सुरू असून, तलाठ्यांपासून ते मंडल अधिकारी आणि भूसंपादन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे उखळ चांगलेच पांढरे होत आहे. दरम्यान, वादात अडकलेला सामान्य शेतकरी मात्र हताशपणे या साऱ्या प्रकाराकडे पाहत आहे.

वारस नोंदींमधील गैरप्रकार चव्हाट्यावर

अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावेच नोंदवली गेलेली नाहीत. काही शेतकरी अगदी महाराष्ट्र राज्याध्या स्थापनेपासूनची जुनी कागदपत्रे गोळा करून हक्क सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, वडिलांच्या मृत्यूनंतर खोटे मृत्युपत्र तयार करून बहिणीची नावे वगळणे, बनावट वारसदार उभे करणे, एवढेच नव्हे तर आई-वडील जिवंत असतानाही त्यांना मयत दाखवून परस्पर नोंदी करून घेणे, असे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे कुटुंबांमध्ये प्रचंड कलह निर्माण झाला असून नात्यांमधील गोडवा पूर्णपणे संपुष्टात आला आहे.

 

 

Web Title: Pune newspurandar airport land acquisition saswad family disputes over satbara 7 12 consent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Land Acquisition
  • maharashtra news
  • pune news
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
1

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

मिडासएक्स कंपनीची गुंतवणूक क्षेत्रात झेप; एमएफ युटिलिटीज इंडियासोबत केली धोरणात्मक भागीदारी
2

मिडासएक्स कंपनीची गुंतवणूक क्षेत्रात झेप; एमएफ युटिलिटीज इंडियासोबत केली धोरणात्मक भागीदारी

पुण्यात ‘या’ तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 
3

पुण्यात ‘या’ तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
4

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.