
पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…
पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत रविवारी (06 सप्टेंबर) डीजे मुक्तीसाठी पुणे महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केलं आहे. राहुल सावंत यांनी बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत डीजे विरोधात आंदोलन करणार असल्याची असल्याचे म्हटले आहे. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौकात, झाशीची राणी पुतळ्याजवळ जमून पुणेकर डीजे मुक्तीविरोधात आवाज बुलंद करतील विद्यानंद बापट यांना समर्थन देण्यासाठी पुणेकरांनी येत्या रविवारी बालगंधर्व चौकात एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.
विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गणेशोत्सवात वाजवले जाणारे कर्णकर्कश डीजेला बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत आहे. या मागणीवरून राजकारणही चांगलंच तापल आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच काल टिळक रोड परिसरात बापट यांना संतोष चव्हाण या तरुणाने मारहाण केली. धक्कादायक म्हणजे बापट हे माध्यम प्रतिनिधींशी बोलत असतानाच संतोष चव्हाण याने बापट यांच्यावर हल्ला केला. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. पण प्रसंगावधान राखत कॅमेरामन आणि इतर पत्रकारांनी त्यांचा बचाव करत चव्हाणला रोखले.
Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
या हल्ल्याबाबत बोलताना बापट म्हणाले की, सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला केला असावा पण आपण आपला लढा सुरूच ठेवणार आहेत. बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर संपूर्ण राज्यातून अनेकांनी निषेध व्यक्त केला. तसेच हल्लेखोरावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. अनेकांनी बापट यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे आता डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी सर्व पणेकरही एकवटल्याचे दिसत आहे.