
पाटील इस्टेट परिसरात तुटलेल्या चेंबरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; मनसेचा महापालिकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम
वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीवाला धोका
सदर रस्ता अरुंद असून, जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा भाग असल्याने येथे दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही सतत ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी चेंबरचे झाकण तुटल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या चेंबरमध्ये वाहनांचे टायर अडकून नुकसान झाले असून, लहान-मोठे अपघातही घडले आहेत. गेल्या आठवड्यात एका लहान मुलाचा पाय चेंबरमध्ये अडकून तो जखमी झाल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.
चेंबरचे झाकण दुरुस्त होत नसल्याने नागरिकांनी तात्पुरता उपाय म्हणून त्यावर लाकडी दरवाजा ठेवला आहे. मात्र, वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे हा लाकडी दरवाजाही तुटत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी महापालिकेने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोन दिवसांची मुदत; अन्यथा आंदोलन
या समस्येबाबत स्थानिक नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी मनसेच्या पाटील इस्टेट येथील कार्यालयात तक्रार केली होती. त्यानंतर पुणे महापालिका आयुक्त, छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आणि पथ विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसांत चेंबरचे झाकण दुरुस्त न केल्यास संबंधित कार्यालयासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी अँथोनी आढाव, संजय तोडमल, केरबा जौंजट, राजू भेकरे, रमेश साठे, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Ans: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उड्डाणपुलाखाली, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ माधुरी स्नॅक्स सेंटरसमोर पावसाळी गटाराचे झाकण तुटले आहे.
Ans: चेंबरमध्ये वाहनांचे टायर अडकून नुकसान होण्याचा आणि पादचाऱ्यांना दुखापत होण्याचा धोका आहे. गेल्या आठवड्यात एका लहान मुलाचा पाय चेंबरमध्ये अडकून तो जखमी झाल्याची माहिती मनसेने दिली आहे.
Ans: येत्या दोन दिवसांत चेंबरचे झाकण दुरुस्त करण्याची मागणी मनसेने केली आहे. निर्धारित मुदतीत दुरुस्ती न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.