बिश्नोई गँगचे मेंबर आहेत का? पुण्यातील टोळ्यांची पोलिसांकडून झाडाझडती
पुणे/ अक्षय फाटक : प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगचं पुणे कनेक्शन उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांची ‘भंबेरी’ उडाली आहे. त्यात देशात गाजलेल्या या दोन्ही हत्येप्रकरणात पुण्यातील तरुणांना अटक झाली. त्यातून बिश्नोई गँगचे सदस्य पुण्यासह जिल्ह्यात असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले. यापार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांकडून शहरातील मुख्य गँग, रायझिंग टोळ्या मोक्कासारख्या गुन्ह्यातून जामीनावर आलेल्या गुन्हेगारांची झडती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषत: गुन्हेगारीकडे आकर्षण असणाऱ्या व नव्याने गुन्हेगारीत आलेल्यांचे सोशल मिडीया हँडेल लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे.
पुण्यातील पेठांमध्ये सुरू झालेल्या गुन्हेगारीचे लोळ अन् लागेबांधे आता देशात आणि जगभरात पोहचल्याचे समोर येऊ लागले आहे. कुरकुंभ एमआयडीत ड्रग्जची निर्माती करून त्याचे वितरण पुण्यातील गुन्हेगारांनी हात-मिळवणी करून देशभरात आणि दुसऱ्या देशात देखील केले असल्याचे एका कारवाईतून उघडकीस आले आहे. तर सिद्धू मुसेवाला हत्येत संशियत म्हणून संतोष जाधवसह ५ जणांना अटक केली होती. तर अभिनेता सलमान खान व त्यांच्या वडिलांना धमकी पत्रप्रकरणात देखील यातील पाचपैकी दोघांची मुंबई पोलिसांनी तेव्हा चौकशी केली होती. यामुळे पुण्यासह जिल्ह्यातही खळबळ उडाली होती. हे प्रकरण संपत असतानाच बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काहींच तासात या हत्येची जबाबदारी देखील बिश्नोई गँगने घेतली आणि काहीच दिवसात पुण्यातील प्रवीण लोणकरला अटक केली. तर त्याचा भाऊ शुभम लोणकर याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये अलीकडे तरूणांना भरती करून घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. राजस्थानात भरती कॅम्पही झाला होता. या कॅम्पमध्ये शुभम लोणकर सहभागी झाला होता. तेथूनच त्याचा बिश्नोई गँगशी संबंध आल्याचे सांगितले जाते. यामुळे शुभम लोणकर, संतोष जाधवसोबत आणखी कोणी बिश्नोई गँगशी कनेक्टेड आहे का ? याची माहिती घेण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू आहेत. परिमंडळ एक ते पाचचे सर्व पोलीस उपायुक्त तसेच गुन्हे शाखेच्या पथकांना याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानूसार कारवाई केली जाणार आहे.
अशी होणार कारवाई…