Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला; पुणे पोलिसांचे ‘महिला बीट मार्शल’ देणार मदतीचा हात

पुणे शहर पोलिसांनी कॉप २४ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असून, महिलांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी ‘महिला बीट मार्शल’ पोहचविण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 11, 2025 | 12:56 PM
महिलांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला; पुणे पोलिसांचे ‘महिला बीट मार्शल’ देणार मदतीचा हात

महिलांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला; पुणे पोलिसांचे ‘महिला बीट मार्शल’ देणार मदतीचा हात

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : पुणे शहर पोलिसांनी कॉप २४ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असून, त्यांचा ड्रेस कोड, त्यांची वाहने आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर आता महिलांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी ‘महिला बीट मार्शल’ पोहचविण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. तरुणी किंवा महिलेने अडचणीच्या काळात मदतीसाठी ११२ ला कॉल केल्यानंतर घटनास्थळी महिला बीट मार्शल पाठविण्याचे नियोजन केले आहे.

व्हिजीबल पोलिसींगच्या धर्तीवर तसेच पुणेकरांच्या तात्काळ मदतीसाठी आणि सुरक्षित भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू केला आहे. कॉप-२४ च्या माध्यमातून २४ तास बीट मार्शल शहरात पेट्रोलिंग करणार आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमात ७२६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यात ५२६ पुरूष व २०० महिला कर्मचारी आहेत. या कॉप्संना वेगळा ड्रेस कोडही केला गेला आहे. त्यांना १२३ दुचाकी वाहने तसेच ३९ सीआर मोबाईल व्हॅन (कार) देण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या हेल्पलाइनवर प्राप्त होणाऱ्या महिलांच्या तक्रार निवारणासाठी घटनास्थळी महिला बीट मार्शलची रवानगी करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे तक्रारदार महिलांना खुलेपणाने त्यांचे म्हणणे मांडता येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घघाटन

पोलिसांच्या कॉप २४ या उपक्रमाचे येत्या १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पोलीस मुख्यालयात पुणे पोलिसांचा ‘तरंग’ हा कार्यक्रम आयोजित केला असून, त्याठिकाणी मुख्यमंत्र्याकडून वेगवेगळ्या उपक्रमांना झेंडा दाखवून उद्घटान होणार आहे.

वाहनांना जीपीएस

‘कॉप २४’ या उपक्रमाअंतर्गत शहरात १२३ दुचाकी आणि ३९ कारचा वापर केला जाणार आहे. या सर्व वाहनांना ‘जीपीएस’ लावण्यात आले आहेत. त्याद्वारे बीट मार्शलवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यामुळे बीट मार्शलकडून कामात हलगर्जी केली जाणार नाही, अशी शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

‘बॉडी कॅमेरा’

सर्व बीट मार्शलच्या वर्दीवर बॉडी कॅमेरा लावण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या वर्दीच्या ठिकाणी बीट मार्शल दाखल झाल्यानंतर तेथे घडणाऱ्या गोष्टींचे रेक़ॉर्डिंग होणार आहे. त्यामुळे पोलिसांवर कोणी आरोप करू शकणार नाही किंवा एखादा कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वागल्यास त्याचीही माहिती त्या रेकॉर्डिंगमधून कळू शकते.

‘कॉप-२४’च्या माध्यमातून पोलिस शहरात गस्त घालणार असून, घटनास्थळी तत्काळ दाखल होणार आहेत. या बीट मार्शलसाठी निळ्या रंगाची वर्दी निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: Pune police will help women in times of trouble nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Police News
  • Pune Police

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
1

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
3

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान
4

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.