Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Politics: दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याच्या शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 27, 2025 | 09:37 AM
Pune Politics: दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Follow Us
Follow Us:
  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली
  • चिन्हावरून दोन्ही पक्षात मतभेद
  • दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा जवळपास संपुष्टात
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच पुणे आणि पिपंरी चिंचवड महापालिकेत आपले वर्चस्व राखण्यासाठी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युतीच्या चर्चा सुरू आहेत. असे असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटल्याची माहिती आहे. निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची या वरून दोन्ही गटात मतभेद झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या दिशेने रोख केला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Pune Politics : हडपसरची राजकीय गणिते आणि ‘संधी’चा शोध; पुण्याच्या राजकारणाचा घ्यावा बोध

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत युतीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत घड्याळ की तुतारी या चिन्हावर लढायच, यावरूनदोन्ही गटात वादाची ठिणगी पडली. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावर तोडगा न निघाल्यामुळे दोन्ही गटातील राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीच्या चर्चा जवळपास फिस्कटल्या आहेत.

घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी अजित पवार (ajit pawar) आग्रही होते. पण त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावर ठाम होते. याच मुद्द्यावरून दोन्ही गटात मतभेद निर्माण झाले. अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षाला ३५ जागांचा प्रस्ताव दिला. तसेच उमेदवारांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रही करण्यात आला, असेही बोलले जात आहे. चिन्हाचा वादावर तोडगा निघत नसल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तातडीने आपला प्लॅन बदलत महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चा सुरू केल्या.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. वरिष्ठ स्तरावरूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला होता. पुणे आणि पिपंरी चिंचवड हे गेल्या काही वर्षांपासून अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जात होते. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत दोन्ही महापालिकांवर आपले वर्चस्व राखण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार असल्याच्याच चर्चा सुरू होत्या. पण चिन्हाबाबत एकमत न जाल्याने युती फिस्कटली. त्यामुळे आता शरद पवार महाविकास आघाडीतूनच आगामी महापालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Prashant Jagtap News: शरद पवार यांची साथ का सोडली? प्रशांत जगतापांनी सांगितलं कारण

दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच पक्षांमध्ये जोरदार धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सुमारे दोन तास सविस्तर चर्चा झाली.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतूनच लढण्याचे महत्त्वाचे संकेत दिले. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र यावी, अशी आमची इच्छा असून त्याबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही दोघेही एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो असून, जिथे शक्य असेल तिथे येत्या काळात एकत्रित निवडणूक लढवली जाईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Pune politics amidst alliance talks sharp differences emerged between the sharad pawar and ajit pawar factions and the alliance discussions fell apart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
1

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
2

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
3

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
4

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.