Prashant Jagtap News: शरद पवार यांची साथ का सोडली? प्रशांत जगतापांनी सांगितलं कारण
प्रशांत जगताप (Prashant Jagtap ) आज (२६ डिसेंबर) काँग्रेसमध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी हे केले. त्यांनी काँग्रेसमध्ये (Congress) सामील होण्याचे कारणही स्पष्ट केले. प्रशांत जगताप यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
“पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा… शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी “काँग्रेस” पक्षात कार्यरत होत आहे.
भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा दिला, आजही काँग्रेस पक्ष भारताला धार्मिक – जातीय द्वेषापासून मुक्त करण्यासाठी लढत आहे. या लढ्याचे नेतृत्व करणारे, संविधानाच्या रक्षणार्थ बलाढ्य शक्तींना आव्हान देणारे देशाचे नेते आदरणीय श्री. राहूलजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे जी यांच्या नेतृत्त्वात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने योगदान देणार आहे.
मला ही संधी देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाचे, पुणे शहरातील सर्व नेत्यांचे व मला भक्कम पाठबळ देणाऱ्या माझ्या सर्व जीवाभावाच्या माणसांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !” अशी पोस्ट करत त्यांनी काँग्रेस नेत्यांचे आभारही मानले.
पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा… शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी “काँग्रेस” पक्षात कार्यरत होत आहे.… — Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 26, 2025
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे पक्षाला वरचढ होताना दिसत आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला बळकटी मिळत असल्याचे दिसून येत आहे.






