NARENDRA MODI
नरेंद्र मोदींचा पुणे दौरा : लोकसभा निवडणुकाची तयारी राज्यामध्ये त्याचबरोबर भारतामधील सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. कार्यकर्ते त्याचबरोबर राजकीय नेते अनेक दौरे करत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपला पाया अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरामध्ये आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांनतर नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत चांदणी चौक पुलाचे लोकर्पण झाले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन महिन्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पुणे शहरात येत आहे.
एकीकडे राज्यामध्ये भाजपचे मिशन ४५ सुरु असताना पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचे केंद्रीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाही पुण्यात आले. नुकतीच संघाची राष्ट्रीय बैठक पुणे शहरात झाली. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे शहरामध्ये लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पुणे विमानतळावरील विस्तारित नवीन टर्मिनल ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे. विमानतळाची नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाली आहे त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी पतंप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येणार आहेत.