Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाराणसीसाठी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजूरी

Amrit Bharat Express Pune to Varanasi : पुणे करांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर भारताती महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्रांना भेट देणे आता सोपे होणार आहे. यासाठी रेल्वे गाड्यांना मंजूरी देण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 02:48 PM
Pune to Varanasi Amrit Bharat Train Gets Approval

Pune to Varanasi Amrit Bharat Train Gets Approval

Follow Us
Follow Us:
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी
  • आता तीर्थ यात्रा होणार सोपी
  • वाराणसीसाठी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजूरी
Pune to Varanasi Train Update : पुणे : पुणे करांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. उत्तर भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांशी थेट रेल्वे जोडणीची मागणी अखेर पूर्ण होणार आहे. पुण्यातून तीर्थक्षेत्र वाराणसीला जाण्यासाठी रेल्वे गाड्यांची कमतरता होती. आता दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

पुणे (Pune) आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक काशी,वाराणसी आणि प्रयागराजला जात असतात. प्रवाशांची ही गरज ओळखून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हडपसर ते बनारस दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याला सकारात्मक प्रतिसाद देत ‘अमृत भारत’ या रेल्वेला मंजुरी दिली आहे. ही गाडी हडपसर टर्मिनलवरून सुटणार असून, यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल.तसेच प्रवाशांना थेट वाराणसीपर्यंत जलद सेवा मिळेल.

हे देखील वाचा : Pune fertilizer Scam : युरिया साठ्यातील तफावत भोवली; पुणे जिल्ह्यातील १५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

या गाड्यांमुळे फक्त पर्यटनच नाही तर व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. लवकरच या दोन्ही गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होऊन त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. त्यामुळे आगामी सुट्ट्यांच्या काळात पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

पुणे-जबलपूर गाडी आता नियमित

पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष गाडी (०२१३१/०२१३२) आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. यापुढे ही गाडी गाडी संख्या २०१६१/२०१६२ ‘पुणे-जबलपूर एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाईल. ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना आता वर्षभर आगाऊ आरक्षण करणे सोपे होणार असून, विशेष गाड्यांचे जास्त तिकीट दरही कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ यांनी पुणे आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना काशी-प्रयागराजच्या तीर्थयात्रेसाठी थेट आणि आरामदायी रेल्वे हवी होती.अमृत भारत एक्सप्रेसच्या मंजुरीमुळे आणि पुणे-जबलपूर गाडी नियमित झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

हे देखील वाचा : Crime News : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण

Web Title: Pune to varanasi amrit bharat train gets approval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Pune
  • Railway News
  • varanasi

संबंधित बातम्या

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
1

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
2

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा
3

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल
4

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.