Pune fertilizer Scam : युरिया साठ्यातील तफावत भोवली; पुणे जिल्ह्यातील १५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित (फोटो सौजन्य-ChatGPT)
हे देखील वाचा : निकोप स्पर्धेमुळेच पुणे परिमंडलाची कामगिरी झळकली; डॉ. भूजंग खंदारे यांच्याकडून कौतुक
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी ही माहिती दिली. निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दौंड (Daund)तालुक्यातील सर्वाधिक ७ केंद्रांचा समावेश आहे. १ एप्रिलपासून जिल्हाभरात युरिया खताच्या साठ्याची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान सुमारे ३५०० टन युरियाचा साठा केवळ कागदावर (पॉस प्रणालीत) असल्याचे समोर आले, जो प्रत्यक्षात विक्री होऊनही प्रणालीतून कमी करण्यात आला नव्हता. यामुळे खताच्या पुरवठा नियोजनात अडथळा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी






