Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune SIR Voter List News: दुबार मतदारांवर चालणार ‘SIR’ची कात्री!; एकाच ठिकाणी नाव राहणार, २४ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी

राज्यातील मतदारयादीत एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास संबंधित मतदाराने सध्या वास्तव्य असलेल्या ठिकाणीच गणना अर्ज भरून देणे अपेक्षित आहे. इतर ठिकाणी असलेल्या नोंदीवर ‘ऑलरेडी एनरोल्ड’ असा शेरा नोंदविला जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 10, 2026 | 11:15 AM
Voter list

Voter list

Follow Us
Follow Us:
  • मतदारयादी पारदर्शक करणे आणि दुबार/अवैध नोंदी पूर्णपणे हटवणे
  • दुबार आढळलेल्या नोंदीवर ‘ऑलरेडी एनरोल्ड’ असा शेरा मारला जाणार
  • नाव वगळण्यापूर्वी मतदाराची बाजू ऐकून घेतली जाईल
Pune SIR Voter List News: मतदार याद्यांमधील दुबार नोंदी शोधून त्या कमी करण्यावर विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) प्रक्रियेत भर देण्यात आला आहे. एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास त्यापैकी सध्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणीच नाव कायम ठेवले जाणार आहे. अन्य ठिकाणच्या नोंदीवर ‘ऑलरेडी एनरोल्ड’ असा शेरा नोंदवून संबंधित नाव प्रारूप मतदारयादीत समाविष्ट केले जाणार नाही. मात्र, कोणत्याही मतदाराची नोंद वगळण्यापूर्वी त्याला सुनावणीची संधी दिली जाणार आहे.

राज्यात एसआयआरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रविवारपर्यंत सुमारे ९८ टक्के मतदारांपर्यंत गणना अर्ज पोहोचले असून, त्यापैकी ७७ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. पुणे जिल्ह्यात २५ टक्क्यांहून अधिक अर्जांचे वाटप झाले असून, त्यापैकी ६५.१४ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

Pune Airport News: शहराच्या विस्तारासोबतच हवाई सुरक्षेची कसरत; पुणे विमानतळ परिसरात बांधकामांच्या एनओसी अर्जात मोठी वाढ

दुबार नावावर ‘ऑलरेडी एनरोल्ड’चा शेरा

राज्यातील मतदारयादीत एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास संबंधित मतदाराने सध्या वास्तव्य असलेल्या ठिकाणीच गणना अर्ज भरून देणे अपेक्षित आहे. इतर ठिकाणी असलेल्या नोंदीवर ‘ऑलरेडी एनरोल्ड’ असा शेरा नोंदविला जाईल. त्यामुळे अशा नोंदी प्रारूप मतदारयादीत राहणार नाहीत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम १७ व १८ नुसार एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघांत मतदार म्हणून नोंदविता येत नाही.

हरकतीसाठी अर्ज क्रमांक ७

एसआयआरनंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत एखाद्या पात्र मतदाराचे नाव नसल्यास २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत अर्ज क्रमांक ६ भरून नाव समाविष्ट करता येणार आहे. मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती करण्यासाठी अर्ज क्रमांक ८ भरता येईल.

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार

याच कालावधीत मतदारसंघातील कोणत्याही मतदाराला एखादी नोंद वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७ द्वारे हरकत घेता येणार आहे. मात्र, केवळ हरकत दाखल झाली म्हणून संबंधित मतदाराचे नाव तत्काळ वगळले जाणार नाही. निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला आपली बाजू मांडण्यासाठी सुनावणीची संधी दिली जाणार आहे.

२७ ऑक्टोबरला अंतिम यादी

दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र नागरिकांना अर्ज क्रमांक ६ भरून मतदारयादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. तसेच मतदारयादीतील नोंदी दुरुस्त करण्याची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

चुकीची माहिती दिल्यास कारवाई

मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, नोंदीत दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा किंवा विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीला एक वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

 

 

 

Web Title: Pune voter list sir verification duplicate voters draft list on 24 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Election Commission
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात
3

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार राजीनाम्याच्या दबावात

Election Commission Clarification: निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांसमोरील पेच कसा सुटणार? आता उरले’हे’ पर्याय
4

Election Commission Clarification: निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांसमोरील पेच कसा सुटणार? आता उरले’हे’ पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.