Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्याला दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सामान्य नागरिकांचे हाल झाले असून शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2026 | 05:49 PM
राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; उकाड्यातून दिल्लीकरांना दिलासा...

राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; उकाड्यातून दिल्लीकरांना दिलासा...

Follow Us
Follow Us:

Pune Rain Update : पुणे : आकाश ढुमे पाटील : पुणे जिल्ह्यात १ व २ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती व नागरी भागात मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील सुमारे १०५ गावे बाधित झाली असून सुमारे २,३५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या नैसर्गिक आपत्तीत दोन ठिकाणी जीवितहानी झाली. पुणे शहरातील पर्वती परिसरात झाड कोसळून रंजना नवनाथ गिरी (वय ५७) यांचा मृत्यू झाला. तसेच खेड तालुक्यात पोल्ट्री शेडचे बांधकाम सुरू असताना वादळामुळे भिंत कोसळून अलका गणपत मसले (वय ५३) यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय खेड तालुक्यात एका गाईचा झाडाची फांदी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

पुणे महानगरपालिका हद्दीतही पावसाचा मोठा परिणाम जाणवला. पाणी साचणे, झाडे पडणे, केबल तुटणे आदी स्वरूपाच्या सुमारे १४५ तक्रारी आपत्कालीन कक्षाकडे प्राप्त झाल्या. त्यापैकी सुमारे २९ तक्रारी गंभीर होत्या. सर्व तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मदत पुरविण्यात आली.

हे देखील वाचा : गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! ‘स्मार्ट सिटी’चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार

शेती क्षेत्रात इंदापूर, शिरूर, आंबेगाव, दौंड आणि बारामती तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. कांदा, गहू, मका, ज्वारी, भाजीपाला यांसह द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा यांसारख्या फळपिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र बाधित झाले असल्याची नोंद आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत मदतकार्य सुरू केले आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांसाठी आपत्कालीन कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला आहे. मदतीसाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

अहवाल

अ. क्र, बाधित तालुका ,गावांची संख्या, लाभार्थी संख्या, क्षेत्र हे. ,शेतीपिके व फळपिके नाव

 

बाधित तालुका गावांची संख्या लाभार्थी संख्या क्षेत्र हेक्टरी पिकांची नावे
भोर 12 155 75 गहू, कांदा, भाजीपाला, फुलपिके, आंबा
इंदापूर 20 338 296 केळी, द्राक्ष, आंबा, मका, ज्वारी, भाजीपाला, कांदा, गहू, लिंबू, डाळिंब
मुळशी 05 84 16 कांदा, भाजीपाला
आंबेगाव 23 755 265 कांदा, भाजीपाला, गहू, आंबा, मका, ज्वारी
खेड 4 10 03  गहू, कांदा, भाजीपाला
दौंड 17 543 205 फुलपिके, चारापिके, गहू, कांदा, भाजीपाला, फळपिके, डाळिंब
शिरूर 97 2,190 1,326 कांदा, भाजीपाला, बाजरी, गहू, मका, कलिंगड
राजगड 07 29 03 कांदा, भाजीपाला, ज्वारी, आंबा
हवेली 10 112 54  कांदा, भाजीपाला, ज्वारी, आंबा

 

बारामतीमध्ये १२ गावे बाधित झाली असून ,२८१ लाभार्थी संख्या आहे. बारामतीमध्ये कांदा, भाजीपाला, फळपिके, डाळिंब या पिकांवर परिणाम झाला आहे. एकूण पुणे जिल्हात १२७ गावे बाधित झाली असून ,४४९८ लाभार्थी हे २३५७ हेक्टरीमध्ये आहेत.

Web Title: 105 villages across 12 talukas in pune district affected by unseasonal rains two dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Rain
  • Rain News

संबंधित बातम्या

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
1

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
2

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी
3

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
4

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.