Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दुबईत अडकलेल्या महिलेची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुटका

Crime News: महिला नेमकी कुठे आहे, याची माहिती मिळवून तिच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. भारतीय वाणिज्य दूतावासाच्या मदतीने तिचा पासपोर्ट परत मिळविण्यात आला. त्यानंतर ती महिला संबंधितांच्या तावडीतून बाहेर पडली.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 20, 2026 | 08:38 AM
Pune News, Maharashtra Crime, Murlidhar Mohol, Dubai Rescue

Pune News, Maharashtra Crime, Murlidhar Mohol, Dubai Rescue

Follow Us
Follow Us:
  • दरमहा सव्वा लाख रुपये पगाराचे आमिष दाखवून महिलेला दुबईत नेले
  • देहविक्रीसाठी दबाव व नकार दिल्यास ५ लाखांची मागणी
  • मुरलीधर मोहोळ यांच्या JM रोड कार्यालयाने महिलेशी साधला थेट संपर्क
 

Crime News: नोकरीच्या आमिषाने दुबईला नेऊन चुकीचे काम करण्यासाठी दबाव टाकत डांबून ठेवलेल्या एका महिलेची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुखरूप सुटका झाली. परराष्ट्र मंत्रालय, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावास आणि आयपीएफ महाहेल्पलाईनच्या मदतीने या महिलेला भारतात परत आणण्यात आले. दरम्यान, नोकरीच्या आमिषाने महिलांना परदेशात नेऊन त्यांची फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे पत्र त्यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे.

माहितीनुसार, संबंधित महिलेचे पती मोहोळ यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात मदत मागण्यास आले होते. पत्नीला दुबईत डांबून ठेवले असून, तिचा पासपोर्टही काढून घेतल्याची माहिती त्यांनी दिली. नंतर मोहोळ यांच्या कार्यालयाने महिलेशी थेट संपर्क साधला.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

कुटुंबावर कर्जाचा बोजा आणि पती दिव्यांग असल्याने संबंधित महिला नोकरीसाठी दुबईला गेली होती. व्हाट्सअप वरून संपर्कात आलेल्या व्यक्तीने तिला हॉटेलमध्ये नोकरी आणि दरमहा सव्वा लाख रुपये पगाराचे आमिष दाखवले होते. मात्र, दुबईत पोहोचल्यानंतर तिला देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिने नकार दिल्यानंतर तिच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तिचा पासपोर्ट काढून घेऊन तिला डांबून ठेवण्यात आले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहोळ यांनी तातडीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या मदतीने महिलेच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. संयुक्त अरब अमिरातीतील महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि आयपीएफ महाहेल्पलाईनचे प्रमुख राहुल तुळपुळे यांच्याशीही संपर्क साधण्यात आला.

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

महिला नेमकी कुठे आहे, याची माहिती मिळवून तिच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. भारतीय वाणिज्य दूतावासाच्या मदतीने तिचा पासपोर्ट परत मिळविण्यात आला. त्यानंतर ती महिला संबंधितांच्या तावडीतून बाहेर पडली. महाहेल्पलाईनच्या सदस्यांनी तिला सुरक्षितपणे भारतीय वाणिज्य दूतावासात पोहोचवले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोहोळ यांच्या कार्यालयाने तिच्या भारत प्रवासासाठी विमान तिकिटाची व्यवस्था केली. त्यानंतर ती सुखरूप मुंबईत परतली. राहुल तुळपुळे यांच्यासह श्वेता करंदीकर, प्रसाद दातार आणि प्रसाद पाटील यांनी महिलेच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न केले.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. नोकरीच्या आमिषाने महिलांना परदेशात पाठवून त्यांची फसवणूक आणि शोषण करणाऱ्या एजंटची मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी संबंधित सरकारी यंत्रणांच्या मदतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title: Pune crime woman trapped in dubai rescued safely murlidhar mohol pune police as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Maharashtra Crime
  • murlidhar mohol
  • pune news

संबंधित बातम्या

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर
1

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी
2

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद
3

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त
4

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.