पोटातून काढली १३ किलोची गाठ, माळशिरसमधील महिलेला मिळालं जीवदान
काळेवाडी रहाटणी परिसरातील स्पर्श हॉस्पिटलमध्ये एका महिलेच्या पोटातून तब्बल १३ किलो १५० ग्रॅमची गाठ काढून महिला रुग्णास जीवदान लाभले. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, एक ३५ वर्षीय महिला सोलापूर-माळशिरस या भागातून स्पर्श हॉस्पिटल मध्ये नाव ऐकून दाखल झाली. तिला साधारणत एक वर्षापासून पोटाचा त्रास चालू झाला. कालांतराने त्रास वाढला. गेल्या दोन महिन्यात पोटाचा घेर वाढणे, दम लागणे, चालताना धाप लागणे भूक न लागणे, पोटात् गैस होणे, पायांना सूज येणे इत्यादी तिने आजार अंगावर काढला, महिला स्पर्श हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर सर्व तपासणी नंतर दिनांक २१ मे रोजी चार तासाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली.
Kidney Failure: किडनी सडल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांना येते सूज, शरीराचे होईल गंभीर नुकसान
शल्य चिकित्सक सर्जन डॉ. अशोक लांडगे व भूलतज्ज्ञ डॉ. बी. दिलीप मेहता डॉ. आदित्य बसवनाथे, डॉ सोपान क्षीरसागर, डॉ. सोमनाथ निकम, डॉ आशिष तायडे डॉ. ऋषी भाकरे आदी सहकारी होते. शस्त्रक्रिया यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी ही प्रदीप तावरे, डॉ. स्नेहल लांडगे तसेच रोशन सावंत ऑपरेशन थिएटर कर्मचारी यांनी सहकार्य लाभले.
आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये डॉ. लांडगे यांनी ५ ते ६ किलो पर्यंतच्या गाठीची हास्वक्रिया यशस्वीपणे केलेल्या असून प्रथमतःच १३ किलोपर्यंत वजनाच्या गाठीची दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्यात आली. आज पर्यंत डॉ. अशोक लांडगे यांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. स्पर्श हॉस्पिटलमध्ये सर्व शस्त्रक्रिया पोटाच्या दुर्बिणीवाटे मुत्ररोग, मुतखडा, कॅन्सर-केमोथेरपी हाडाबी जॉईट रिफ्रेसमेंट शस्त्रक्रिया माफक दरात केल्या जातात. त्यासाठी लागणारे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असते.
सावधान! पोटात गाठ झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
पुणे येर्थील आमच्या नातेवाईकाकडून स्पर्श हॉस्पिटल व डॉ. अशोक लांडगे यांच्या बद्दल ऐकून आम्ही येथे दाखल झालो. सर्व तपासण्यां अंती डॉक्टरांच्या टीमने चार तास शस्त्रक्रिया केली, शस्त्रक्रियेनंतर आमच्या रुग्णाचे सर्व लक्षणे, पोटाचा घेर, पायाची सूज, दम लागणे इत्यादी कमी झाली व रुग्ण शस्त्रक्रियेतून सुखरूप बाहेर आला व बारा झाला. एक प्रकारचे आमच्या रुग्णास नवजीवन मिळाले असे आम्हास वाटते.
— राजेंद्र साळवे, कुणाल निकाळजे, रुग्णाचे नातेवाईक