किडनी सडल्यानंतर शरीराच्या 'या' अवयवांना येते सूज
चुकीची जीवनशैली, कामाचा तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप किंवा आहारात कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी महत्वपूर्ण कार्य करते. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरास हानी पोहचते. किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. मात्र हल्लीच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा वजन कमी करताना घेतल्या जाणाऱ्या प्रोटीनशेकमुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला किडनी सडल्यानंतर शरीरातील कोणत्या अवयवांना सूज येते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सावधान! पोटात गाठ झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
शरीरात कोणत्याही सामान्य किंवा गंभीर आजाराची लक्षणे दिसू लागल्यास बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीराचे हेच छोटे आजार मोठे स्वरूप घेतात आणि संपूर्ण शरीरात पसरू लागतात. किडनीसंबंधित आजाराची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. किडनी सडण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीराच्या काही अवयवांना सूज येते. शरीराला आलेली सूज गंभीर आजारांचे संकेत आहे.
किडनी खराब झाल्यानंतर पायांच्या घोट्याना सूज येऊ लागते. बऱ्याचदा ही समस्या अतिशय सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. किडनी खराब झाल्यानंतर शरीरातील अनावश्यक द्रव आणि सोडियम शरीरात साचून राहते, ज्यामुळे किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात साचून राहिलेला हा द्रव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
किडनी आतून पूर्णपणे निकामी झाल्यानंतर चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सूज येते. ही सूज आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. चेहऱ्यावर आलेली सूज किडनी निकामी झाल्यानंतर दिसून येणारे प्रमुख लक्षण आहे. ही सूज चेहऱ्यावर आणि डोळ्यांच्या खालील भागात प्रामुख्याने दिसून येते. त्यामुळे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
पाठीत भरलेली चमक तात्काळ उतरेल! पाठदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील गुणकारी
किडनी निकामी झाल्यानंतर शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज येण्याची शक्यता असते. हात, पाय,मी चेहरा किंवा शरीरावरील कोणत्याही अवयवांना सूज येऊ लागते. ही सूज आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यानंतर किडनीला सूज येते. अशावेळी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.