Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Railway Station पुणे रेल्वे स्थानकावर आता हायटेक सुरक्षा! १६० CCTV कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांवर करडी नजर 1

एखादी व्यक्ती हरवल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिचे छायाचित्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यास ती व्यक्ती कॅमेऱ्यांच्या नजरेस पडताच आरपीएफला तत्काळ सूचना मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 03:46 PM
Pune Railway Station वर अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित; आरपीएफला मिळणार स्वयंचलित अलर्ट

Pune Railway Station वर अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित; आरपीएफला मिळणार स्वयंचलित अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • पुणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
  • गुन्हेगार आणि हरवलेल्या व्यक्तींची होणार तत्काळ ओळख
  • आरपीएफला मिळणार स्वयंचलित अलर्ट
चंद्रकांत कांबळे/पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज १६० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.या कॅमेऱ्यांमध्ये संशयास्पद हालचाली, गुन्हेगारांची ओळख तसेच हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.या नवीन कॅमेऱ्यांपैकी १९ कॅमेरे हे उच्च दर्जाच्या ४ के रिझोल्यूशनचे आहेत.रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) असलेल्या गुन्हेगारांच्या छायाचित्रांचा डेटाबेस या सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.त्यामुळे संबंधित गुन्हेगार कॅमेऱ्यांच्या कक्षेत येताच आरपीएफ नियंत्रण कक्षाला त्वरित अलर्ट मिळणार आहे.

याशिवाय, एखादी व्यक्ती हरवल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिचे छायाचित्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यास ती व्यक्ती कॅमेऱ्यांच्या नजरेस पडताच आरपीएफला तत्काळ सूचना मिळेल.त्यामुळे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अधिक सुलभ होणार आहे.या प्रणालीमध्ये आणखी आधुनिक सॉफ्टवेअर जोडण्याचे काम सुरू आहे,असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.स्थानकावरील पादचारी पुलावर किंवा इतर ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास ही प्रणाली धोक्याचा इशारा देणार असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाला तातडीने उपाययोजना करता येणार आहेत.

जुने ७५ कॅमेरे टप्प्याटप्प्याने हटविणार

सध्या पुणे रेल्वे स्थानकावर एकूण २३५ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.त्यामध्ये नव्याने बसविण्यात आलेले १६० आणि जुने ७५ कॅमेरे आहेत.जुने कॅमेरे वारंवार बिघाड होत असल्याने आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा खर्च होत असल्याने पुढील सहा महिन्यांत ते टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार आहेत.

देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

तीन अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर कार्यरत

प्रवाशांच्या सामानाची प्रभावी तपासणी करण्यासाठी स्थानकावर तीन अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर मशीन बसविण्यात आली आहेत.या स्कॅनरमध्ये वरच्या आणि खालच्या बाजूने तपासणी करणारी प्रणाली असल्याने संशयास्पद अथवा धोकादायक वस्तूंचा शोध अधिक अचूकपणे घेता येणार आहे.

ठळक मुद्दे

–    पुणे रेल्वे स्थानकावर १६० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

–    १९ कॅमेरे उच्च दर्जाच्या ४ के रिझोल्यूशनचे

–    गुन्हेगार कॅमेऱ्यांच्या कक्षेत येताच आरपीएफला स्वयंचलित अलर्ट

–    हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर

–    पुढील सहा महिन्यांत जुने ७५ कॅमेरे हटविणार

–    स्थानकावर तीन अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर मशीन कार्यरत

पिंपरी-चिंचवडच्या ‘स्मार्ट’ सुरक्षेचा बोजवारा, 500 सीसीटीव्ही कॅमेरे गायब; शेकडो बंद

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नवीन अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.यामुळे कोणती अनुचित घटना घडत असेल किंवा धोकादायक स्थिती निर्माण झाली तर हे कॅमेरे संबंधित यंत्रणेला अलर्ट करतील.

हेमंम कुमार बेहरा,

जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे पुणे

Web Title: 160 cctv cameras activate in pune railway station rpf for passengers safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • CCTV
  • Indian Railway
  • pune news
  • Pune Railway Station News

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; १९ वीजचोरांवर गुन्हे, नऊ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी
1

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; १९ वीजचोरांवर गुन्हे, नऊ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी
2

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग
3

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
4

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.