Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती विशेष लोक अदालतीत 62 खटले निकाली; 89 लाखांची झाली वसुली

कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीच लोक अदालत आयोजित करण्यात आल्याने न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांनाही लोक अदालतीच्या माध्यमातून जलद व सुलभ न्याय मिळू शकतो, याची प्रेरणा मिळाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 19, 2026 | 01:32 PM
बारामती विशेष लोक अदालतीत 62 खटले निकाली; 89 लाखांची झाली वसुली

बारामती विशेष लोक अदालतीत 62 खटले निकाली; 89 लाखांची झाली वसुली

Follow Us
Follow Us:

बारामती : तालुका विधी सेवा प्राधिकरण, बारामती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष लोक अदालतीला मोठे यश मिळाले. या लोक अदालतीत एकूण ६२ खटले सामोपचाराने निकाली काढण्यात आले असून, ८९ लाख १२ हजार १८३ रुपयांची वसुली करण्यात आली.

या विशेष लोक अदालतीत ६ वे सहायक दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रितेश सु. भंडारी यांनी पॅनेल प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. या लोक अदालतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे निकाली काढण्यात आलेल्या ६२ खटल्यांपैकी १९ खटले १० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होते, तर १३ खटले पाच वर्षांपासून प्रलंबित होते. अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेले जुने वाद सामोपचाराने मिटल्याने पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.

‘२०१४ नंतर जगाचे संदर्भ बदलले,आज भारताचा जगात एकही मित्र नाही’ हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्रावर निशाणा

कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीच लोक अदालत आयोजित करण्यात आल्याने न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांनाही लोक अदालतीच्या माध्यमातून जलद व सुलभ न्याय मिळू शकतो, याची प्रेरणा मिळाली. काही वैवाहिक प्रकरणांतील जोडप्यांनी स्वतःहून पुढे येत आपली व्यथा मांडली आणि तडजोडीची विनंती केली. त्यांना यावेळी योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

या यशासाठी प्रलंबित व तडजोडयोग्य प्रकरणांची पूर्वतयारी, पक्षकार, वकील, बँका व वित्तीय संस्थांशी आधीच संपर्क, पूर्वसमुपदेशन व पूर्वतडजोड बैठका, तसेच लोक अदालतीचे फायदे समजावून सांगणे, या उपाययोजना करण्यात आल्या. बँका व वित्तीय संस्थांना एकरकमी तडजोड योजनेचा लाभ देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. न्यायाधीश, पॅनेल सदस्य, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळे हे यश मिळाले.

या विशेष लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन तसेच बारामतीतील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांनी विशेष मेहनत घेतली. ऐनवेळी आलेल्या प्रकरणांचाही लोकअदालतीत समावेश करण्यात आला. सदर लोक अदालत यशस्वी होण्यासाठी बारामतीचे जिल्हा न्यायाधीश व्ही.सी बर्डे व एच . ए.वाणी यांनी वेळोवेळी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

आणखी खटले निकामी काढणार

आगामी लोक अदालतीमध्ये यापेक्षाही अधिक खटले निकाली काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास पॅनल प्रमुख व न्यायाधीश प्रितेश पु. पंढरी यांनी व्यक्त केला.

Web Title: 62 cases cleared of at the baramati special lok adalat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • baramati news
  • Court News

संबंधित बातम्या

Baramati News: विकासाचा विठ्ठल आमचा?; कवी विनोद खटकेंच्या कवितेने महाराष्ट्र हेलावला
1

Baramati News: विकासाचा विठ्ठल आमचा?; कवी विनोद खटकेंच्या कवितेने महाराष्ट्र हेलावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.