Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील खुर्चीवर बसण्यावरून भाजपच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 05:24 PM
अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : सत्तेच्या खुर्चीसाठी विरोधकांवर टीका करणार्‍या भाजपमध्येच आता खुर्चीवरून जातीय राजकारण उफाळून आल्याचे पुण्यात पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील खुर्चीवर बसण्यावरून भाजपच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. ‘हा मराठ्यांचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसलात तर उगाचच वाद होईल,’ असा टोला अभिमन्यू पवार यांनी मारल्यामुळे संतप्त झालेल्या मेधा कुलकर्णी या तडकाफडकी कार्यक्रमातून निघून गेल्या.

 

या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) गणेश कला क्रीडा मंच येथे यूपीएससी, एमपीएससी आणि अन्य विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध पक्षाचे आमदार, खासदार उपस्थित होते. याच कार्यक्रमात पहिल्या रांगेतील खुर्चीवर बसण्यावरून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दीक वाद झाला.

कार्यक्रम सुरू होण्यासाठी काही मिनिटे बाकी असताना नेत्यांचे आगमन होत होते. काही नेते मंचावरील खुर्च्यांवर स्थानापन्न होत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णीही मंचावर आल्या होत्या. प्रोटोकॉलप्रमाणे खासदार कुलकर्णी यांना अधिकार्‍यांनी पहिल्या रांगेत बसण्याच्या सुचना केल्या मात्र, तेथे उपस्थित असलेले भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘हा मराठ्यांचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसलात तर उगाचच वाद होईल,’ असा टोला मेधा कुलकर्णी यांना लगावला. अभिमन्यू पवार यांचे बोलणे खटकल्याने संतप्त झालेल्या मेधा कुलकर्णी या तडकाफडकी कार्यक्रमातून निघून गेल्या.

खासदार मेधा कुलकर्णी यांचा गैरसमज झाला आहे. मी फक्त नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष असल्याने ते पुढच्या रांगेतील खुर्चीवर बसतील. आपण खासदार, आमदार मागे बसू एवढेच बोललो होतो. जाती-पातीबद्दल मी काहीही बोलो नाही. मेधा कुलकर्णी यांनी मी काय बोललो ते नीट आठवून बघावे. – अभिमन्यू पवार, भाजप आमदार.

हे सुद्धा वाचा : ‘गँगस्टरही अशी भाषा बोलणार नाही, असं खासदार बोलतोय’; राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलांवर निशाणा

नरेंद्र पाटील हे पुढच्या रांगेत बसतील असे मीच सांगितले होते. परंतु अभिमन्यु पवार हे मी पुढे बसतो म्हणत होते. खुर्च्या रिकाम्या असतील तर प्रोटोकॉलनुसार मेधा कुलकर्णी पुढे बसतील असे अधिकारी सांगत होते. यावेळी अभिमन्यू पवार यांनी हा मराठ्यांचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसलात तर वाद होईल असे असभ्य भाष्य केले. त्यामुळे मी तिथून निघून आले. हा वाद पुढे बसण्याचा नाही. तर कार्यक्रम मराठ्यांचा आहे आणि तिथे ब्राम्हण बसल्याने वाद होणार असेल तर तीथून निघून जाणेच योग्य ठरेल म्हणून मी कार्यक्रमातून निघून आले. – डॉ. मेधा कुलकर्णी, भाजप खासदार.

Web Title: A dispute has broken out between mla abhimanyu pawar and mp medha kulkarni in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Medha Kulkarni
  • pune news

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.