Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर चिमुकल्यांच्या मैदानावर फिरला बुलडोझर; विरोध डावलून आरोग्य केंद्राचे काम सुरु

वादग्रस्त ठरलेल्या पिसर्वे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आरोग्य केंद्राचे अतिक्रमण अखेर 'फिक्स' झाले आहे. राजकीय हस्तक्षेपाने अखेर चिमुकल्यांच्या मैदानाचा घास घेतला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2026 | 05:16 PM
अखेर चिमुकल्यांच्या मैदानावर फिरला बुलडोझर; विरोध डावलून आरोग्य केंद्राचे काम सुरु

अखेर चिमुकल्यांच्या मैदानावर फिरला बुलडोझर; विरोध डावलून आरोग्य केंद्राचे काम सुरु

Follow Us
Follow Us:

पिसर्वे : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या पिसर्वे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आरोग्य केंद्राचे अतिक्रमण अखेर ‘फिक्स’ झाले आहे. राजकीय हस्तक्षेपाने अखेर चिमुकल्यांच्या मैदानाचा घास घेतला. प्रचंड विरोध व वादविवादानंतर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा तीव्र विरोध असताना देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरु करण्यात आले आहे. मुलांच्या हक्काच्या मैदानावर होत असलेल्या सरकारी अतिक्रमणामुळे पालक संतप्त झाले असून, त्यांनी पुरंदरच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे विशेष ग्रामसभेची मागणी केली आहे.

 

शालेय शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी गावाला अत्यावश्यक आहेतच. मात्र यावर ग्रामसभेच्या माध्यमातून सुवर्ण मध्य काढण्याऐवजी प्रशासन करीत असलेली कुरघोडी पाहता. मुलाचे मैदान वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच यात लक्ष घालावे लागणार आहे, असे मत नागरीकांनी व्यक्त केले.

प्राथमिक शाळेच्या मैदानात आरोग्य केंद्र बांधण्याच्या विरोधात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी लेखी स्वरूपात विरोध करून देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आज प्रत्यक्ष बुलडोझरच्या सहाय्याने खोडी करून काम सुरु केले आहे. शाळेच्या आवारात अशाप्रकारे बांधकाम झाल्याने भविष्यात शाळेच्या विस्ताराला व खेळला जागाच उरणार नाही. -रोहिदास कोलते, शिक्षण तज्ञ, शाळा व्यवस्थापन समिती

प्रोटोकॉल तोडून भूमिपूजन

विकास कामांच्याबाबत असलेला प्रोटोकॉल पिसर्वे येथे तोडण्यात आला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे व पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर व माऊली यादव यांच्या अनुपस्थितीत कोट्यावधी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करून काम सुरु करण्यात आले.

शाळेचे मैदान हे विध्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आणि खेळासाठी राखीव असते, मात्र याच जागेवर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम प्रस्तावित करून प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने यापूर्वीच ठराव देऊन या बांधकामाला विरोध दर्शविला होता. आरोग्य केंद्र होणे गरजेचे आहेच परंतु त्यासाठी मुलांचे मैदान हिरावून घेणे कितपत योग्य आहे. – हनुमंत कोलते, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.

हे सुद्धा वाचा : शाळा, महाविद्यालयांत सांस्कृतिक उपक्रमांना नवचैतन्य; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलाक्षेत्रांना मिळतोय वाढता प्रतिसाद

Web Title: A health center has encroached on the grounds of the zilla parishad primary school in pisarve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Purandar News
  • School

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
2

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
3

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

सोनोरीत रस्त्याला २० लाख खर्च तरीही खड्डेच; बांधकाम अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
4

सोनोरीत रस्त्याला २० लाख खर्च तरीही खड्डेच; बांधकाम अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.