Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात चाकण परिसरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2026 | 05:54 PM
चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, औद्योगिक वाहनांची वर्दळ, रस्त्यांवरील खड्डे आणि अनधिकृत वाहनतळांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कृती आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात चाकण परिसरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

 

चाकण, तळेगाव, बोराटे वस्ती आणि भोसरी परिसरातील जोडरस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रलंबित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांचीही पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या.

एआय तंत्रज्ञानाद्वारे वाहतूक नियंत्रण

वाहतूक नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. प्रमुख चौकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाईसाठी करावा. आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांना स्थिर तसेच फिरते निरीक्षण कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत, असेही डुडी यांनी सांगितले. चाकण चौकासह परिसरातील प्रमुख चौकांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून वाहतुकीचा प्रवाह आणि पादचारी सुरक्षेचा विचार करावा. त्यानुसार उन्नत पादचारी मार्ग, भुयारी मार्ग, वाहतूक बेटे आणि सुरक्षित वळणमार्ग यांचा तांत्रिक अभ्यास करून सुधारित आराखडा तयार करावा, असे निर्देश देण्यात आले.

अनधिकृत वाहनतळांवर कारवाई

रस्त्यांवरील अनधिकृत वाहनतळांविरोधात टोईंग वाहनांच्या माध्यमातून वाहने हटविणे, दंड आकारणे आणि आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी. औद्योगिक कंपन्या व वाहतूक संघटनांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ अथवा थांबा व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांनी घ्यावी. उपलब्ध मोकळ्या जागांचा शोध घेऊन वाहनतळांची व्यवस्था करावी, तसेच त्यावर प्रत्यक्ष वेळेतील देखरेख व्यवस्था विकसित करावी, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

चाकण-शिक्रापूर मार्गासाठी वाहतूक नियोजन

चाकण-शिक्रापूर मार्गावरील रस्ते सुधारणा कामे टप्प्याटप्प्याने होणार असल्याने काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक नियोजन पूर्ण करावे. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करावा, तर हलक्या वाहनांसाठी आवश्यकतेनुसार एकेरी वाहतुकीचे नियोजन करावे. रस्ते कामांच्या ठिकाणी भारतीय रस्ते मानकांनुसार सुरक्षाव्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर आधी दिशादर्शक फलक आणि वाहतूक मार्गांचे नकाशे लावावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या.

अतिक्रमण हटविल्यानंतर विद्युत खांब व तारा हलविण्याची कामे एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वयाने तातडीने पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारीतील कामांची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. बैठकीत चाकण परिसरातील नागरिकांनी वाहतूक, रस्ते, वाहनतळ आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्न मांडले. या प्रश्नांवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.

Web Title: A meeting regarding the roads and traffic system in the chakan area was held at the district collectors office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Chakan News
  • Jitendra Dudi
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
1

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
2

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’
3

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
4

दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.