Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम इंदापूर तालुक्यात वाजू लागले असून, सहकारी संस्थांचे ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 12, 2026 | 06:07 PM
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरात मोर्चेबांधणी; भरणेवाडीत सहकारातील दिग्गजांची संयुक्त बैठक

Follow Us
Follow Us:

इंदापूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम इंदापूर तालुक्यात वाजू लागले असून, सहकारी संस्थांचे ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत ठराव पाठविण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुक पॅनेलच्या समर्थकांकडून सहकारी संस्था, पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, पदाधिकारी आणि संचालकांशी संपर्क साधण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे इंदापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वीच तापले आहे.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ११) भरणेवाडी येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी सहकार क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीला नगराध्यक्ष, नगरसेवक, पतसंस्थांचे अध्यक्ष, सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, संचालक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इंदापुरातून सुरू झालेल्या मोर्चेबांधणीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

२० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी २२ सप्टेंबरपर्यंत ठराव पाठविण्याची मुदत आहे. मात्र, तालुक्यातील संबंधित प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. ठरावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, संस्थांची माहिती व्यवस्थित असावी आणि मतदानाचा अधिकार असलेल्या संस्थांची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी पदाधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, अशा सूचना देण्यात आल्या.

‘कोणाचीही अडवणूक न करता न्यायाची भूमिका’

बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कोणत्याही संस्था अथवा व्यक्तीची अडवणूक न करता न्यायाची भूमिका घेतल्याचे सांगितले. हर्षवर्धन पाटील आता सोबत असल्याने आगामी निवडणुकीत त्याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत सर्वांनी एकजुटीने पॅनेलच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन भरणे यांनी केले.

ठरावात त्रुटी नको; मतदानाचा अधिकार जपा

जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी ठराव प्रक्रियेतील बारकाव्यांकडे लक्ष वेधले. काही ठराव कोरे असल्यास त्यांची योग्य तपासणी करावी. तसेच काही संस्थांचा शिक्षण निधी भरलेला नसल्यास मतदानाचा अधिकार बाधित होऊ शकतो. त्यामुळे संबंधित संस्थांनी आवश्यक रक्कम वेळेत भरावी, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक बिनविरोध होईल की नाही, याचा विचार न करता सर्वांनी आपली तयारी पूर्ण ठेवली पाहिजे, असा स्पष्ट संदेशही जगदाळे यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

भरणे-जगदाळेंना विजयी करण्याचे आवाहन

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी जिल्हा बँक ही सहकार क्षेत्राची ‘जीवनदायिनी’ असल्याचे सांगितले. दत्तात्रय भरणे आणि आप्पासाहेब जगदाळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कारखाना सुरू होऊन एक लाख कुटुंबांचा प्रपंच सावरला, असा दावाही त्यांनी केला. नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनीही सर्व सहकारी संस्थांनी एकत्रितपणे काम करून ठरावाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

Web Title: A meeting was held in indapur to prepare for the upcoming pune district bank election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Dattatray Bharne
  • indapur news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

पुण्याच्या विकासाला ‘स्पीड’! सुनेत्रा पवारांचा PMRDAला थेट आदेश; इनर रिंग रोड, मेट्रोसह पाणी-वाहतुकीवर मोठा फोकस
1

पुण्याच्या विकासाला ‘स्पीड’! सुनेत्रा पवारांचा PMRDAला थेट आदेश; इनर रिंग रोड, मेट्रोसह पाणी-वाहतुकीवर मोठा फोकस

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
2

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!
3

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन
4

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.