Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

14 बोगदे, 93 पूल अन्…; पुण्यात 52 हजार कोटींच्या रिंग रोडचे काम वेगाने सुरु

पुणे शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे चक्राकार मार्गाचे (रिंग रोड) काम वेगाने सुरू आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2026 | 01:07 PM
14 बोगदे, 93 पूल अन्...; पुण्यात 52 हजार कोटींच्या रिंग रोडचे काम वेगाने सुरु

14 बोगदे, 93 पूल अन्...; पुण्यात 52 हजार कोटींच्या रिंग रोडचे काम वेगाने सुरु

Follow Us
Follow Us:

पुणे/आकाश ढुमेपाटील : पुणे शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे चक्राकार मार्गाचे (रिंग रोड) काम वेगाने सुरू आहे. सुमारे ५२ हजार कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहरातून जाणाऱ्या अवजड व मालवाहतूक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, चांदणी चौक, नवले पूल, कात्रज घाट, हडपसर तसेच अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

पुणे शहरात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून येणारी मोठ्या प्रमाणावरील अवजड आणि मालवाहू वाहने सध्या शहराच्या अंतर्गत भागातून मार्गक्रमण करतात. बाह्यवळणाचा प्रभावी पर्याय उपलब्ध नसल्याने शहरातील वाहतूक कोंडीबरोबरच वायू व ध्वनी प्रदूषणाची समस्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेश नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) रिंग रोड उभारण्यात येत आहे. सुमारे १७० किलोमीटर लांबीचा हा चक्राकार मार्ग ६ ते ८ पदरी असणार आहे. काँक्रीटच्या या मार्गावर वाहनांना ताशी १२० किलोमीटरपर्यंत वेगाने प्रवास करता येणार आहे. भविष्यात या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्याच्या मध्यभागी आवश्यक जागाही राखीव ठेवण्यात आली आहे.

१४ बोगदे, ९३ पूल-वायडक्ट

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून मार्ग काढताना प्रकल्पात १४ मोठे बोगदे, तसेच ९३ पूल आणि वायडक्ट उभारण्यात येणार आहेत. वाहतुकीची जोडणी अधिक सुलभ करण्यासाठी १६ इंटरचेंज प्रस्तावित आहेत. हा चक्राकार मार्ग तब्बल ९ राष्ट्रीय महामार्गांना जोडणार असून, पुणे जिल्ह्यातील ६ तालुके आणि ८२ गावांना त्याचा थेट लाभ होणार आहे.

या रिंग रोडमुळे पुणे शहरातून केवळ जाण्यासाठी येणारी अवजड वाहने शहराबाहेरूनच पुढे मार्गस्थ होतील. त्यामुळे शहरातील प्रमुख चौक, उड्डाणपूल आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होण्याबरोबरच प्रदूषणालाही आळा बसण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील दारूकांडानंतर FDA अ‍ॅक्शन मोडमध्ये! तुकाराम मुंडे म्हणाले, ‘मद्यावर कारवाई…’

पश्चिम टप्पा २०२८, पूर्व टप्पा २०२९ मध्ये

प्रकल्पाचा पश्चिम भाग २०२८ मध्ये, तर पूर्व भाग २०२९ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. रिंग रोड पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पुणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण जवळपास निम्म्याने कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुण्याच्या वाढत्या नागरीकरणाला आणि औद्योगिक विस्ताराला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे.

Web Title: A ring road will be built in pune to reduce traffic congestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Traffic News

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.