Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिफ्टच्या दरवाजात चिमुकलीचा हात अडकला; पिंपरी-चिंचवड परिसरातील थरारक घटना

एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत चिमुकलीचा हात अडकल्याची थरारक घटना घडली आहे. सुदैवाने, काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तिचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 14, 2026 | 05:24 PM
लिफ्टच्या दरवाजात चिमुकलीचा हात अडकला; पिंपरी-चिंचवड परिसरातील थरारक घटना

लिफ्टच्या दरवाजात चिमुकलीचा हात अडकला; पिंपरी-चिंचवड परिसरातील थरारक घटना

Follow Us
Follow Us:
  • लिफ्टच्या दरवाजात चिमुकलीचा हात अडकला
  • पिंपरी-चिंचवड परिसरातील थरारक घटना
  • सुदैवाने मोठा अनर्थ टळला
पिंपरी : लिफ्टचा वापर करताना लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात आला आहे. एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत चिमुकलीचा हात अडकल्याची थरारक घटना घडली आहे. सुदैवाने, काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तिचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे सोसायटी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दिघीतील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. एक महिला आपल्या काही महिन्यांच्या चिमुकलीसह लिफ्टमधून इच्छित मजल्यावर जात होती. लिफ्ट थांबल्यानंतर दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद होऊ लागला. याच वेळी चिमुकलीने सहजपणे आपला हात लिफ्टच्या दरवाजावर ठेवला. दरवाजा बंद होत असताना तिचा हात दरवाजाच्या सापटीत अडकला.

हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील महिलेसह आजूबाजूचे नागरिक घाबरले. चिमुकली वेदनेने जोरात रडू लागली. तिला तातडीने मदत करण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी प्रयत्न सुरू केले. काही मिनिटे प्रयत्न केल्यानंतर तिचा हात सावधपणे बाहेर काढण्यात आला. सुदैवाने या घटनेत चिमुकलीला गंभीर दुखापत झाली नाही.

दरम्यान, ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना लिफ्टचा वापर करताना विशेषतः लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याचे आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोसायटी व्यवस्थापनांनी लिफ्टची नियमित तपासणी व सुरक्षा यंत्रणा कार्यरत ठेवणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये आता 10 क्षेत्रीय कार्यालये; राष्ट्रवादी-शिवसेनेचा विरोध डावलून भाजपाकडून प्रस्ताव मंजूर

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर खाजगी बसने घेतला पेट

पुणे – अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील अष्टविनायक श्री महागणपती मंदिरासमोर एका चालत्या खाजगी बसने अचानक पेट घेतला. परंतू बसचालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविल्यामुळे बसमधील ३६ प्रवाशांचे प्राण वाचले, मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही बस रस्त्याच्या कडेलाच असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास दोन तास विस्काळीत झाली होती.

Web Title: A shocking incident has taken place in pimpri chinchwad where a toddlers hand got stuck in an elevator door

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pimpri
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.