Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यात तीव्र ‘पाणीबाणी’, सव्वा लाखांहून अधिक नागरिक टँकरच्या भरवशावर; ‘हा’ तालुका सर्वाधिक टंचाईग्रस्त

पुणे जिल्ह्यात यंदा तीव्र उन्हाळ्याच्या झळांमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ७१५ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 22, 2026 | 10:57 AM
पुणे जिल्ह्यात तीव्र 'पाणीबाणी’, सव्वा लाखांहून अधिक नागरिक टँकरच्या भरवशावर; 'हा' तालुका सर्वाधिक टंचाईग्रस्त

पुणे जिल्ह्यात तीव्र 'पाणीबाणी’, सव्वा लाखांहून अधिक नागरिक टँकरच्या भरवशावर; 'हा' तालुका सर्वाधिक टंचाईग्रस्त

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्ह्यात यंदा तीव्र उन्हाळ्याच्या झळांमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ७१५ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील ८१ गावे आणि ३७९ वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून ८२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यातील आंबेगाव तालुका सर्वाधिक पाणीटंचाईग्रस्त ठरला असून, पारंपरिक दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यालाही त्याने टंचाईच्या तीव्रतेत मागे टाकले आहे.

 

आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती

आंबेगाव तालुक्यातील २८ गावे आणि ९५ वाड्या-वस्त्या सध्या पाणीटंचाईच्या विळख्यात सापडल्या आहेत. येथील सुमारे ३१ हजार लोकांची तहान भागवण्यासाठी तब्बल २५ टँकर्स सुरू करावे लागले आहेत. या उलट, नेहमी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यात आतापर्यंत केवळ ७ टँकर्स सुरू आहेत.

इतर तालुक्यांमधील टँकर्सची आकडेवारी

जुन्नर तालुका : १६ टँकर्सद्वारे १२ गावे आणि १०३ वाड्या-वस्त्यांवरील १३,६८६ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

खेड तालुका : १० टँकर्सच्या मदतीने १३ गावे आणि १०५ वाड्या-वस्त्यांवरील २४,३९१ लोकांची तहान भागवली जात आहे.

भोर तालुका : ८ टँकर्स सुरू आहेत.

हवेली आणि पुरंदर तालुका : पुणे शहरालगतच्या हवेली तालुक्यात ७, तर पुरंदर तालुक्यात ७ टँकर्स सुरू आहेत.

१३ हजारांहून अधिक जनावरांचे हाल

या पाणीटंचाईचा फटका केवळ मानवालाच नाही तर मुक्या जनावरांनाही सोसावा लागत आहे. जिल्ह्यातील तब्बल १३,४७३ जनावरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; ५०० कोटींपैकी तब्बल ‘इतक्या’ रकमेचे वाटप पूर्ण

शेकडो कोटींच्या योजना कागदावरच?

पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. येत्या दोन दिवसांत अनेक धरणांमधून कालव्यांमध्ये शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडले जाणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. मात्र, धरणांच्या लाभक्षेत्राबाहेर असलेल्या गावांना या पाणीटंचाईने ग्रासले आहे. केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्याचा दावा केला जात असला, तरी ग्रामीण भागातील पाणीटंचाईची वस्तुस्थिती मात्र अजूनही कायम आहे.

Web Title: A water shortage crisis has arisen in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Water Issue

संबंधित बातम्या

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
1

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
2

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
3

Navaratri साठी पुण्यनगरी सज्ज! घटस्थापनेसह ‘या’ प्रमुख मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
4

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.