Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड

मंचर येथील दूध भेसळ प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अकलूजमध्ये मोठी कारवाई करत 1.35 कोटी रुपयांची संशयित पावडर जप्त केली. पिलीव येथील डेअरीवरही धाड टाकून 7,634 लिटर संशयित दूध नष्ट करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Jul 09, 2026 | 09:16 PM
दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड

Follow Us
Follow Us:

पंढरपूर | शिवाजी हळणवर : दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचा फटका आता थेट सोलापूर जिल्ह्यालाही बसला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे राज्यातील गाजलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच मुंढे यांनी माळशिरस तालुक्यातील अकलूजपर्यंत पोहोचलेल्या या साखळीवर दुसरा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत आणखी एक मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे.

अकलूज येथील गोदामावर टाकलेल्या छाप्यात तब्बल ९६ हजार ७८० किलो संशयित पावडर जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत १ कोटी ३५ लाख ४६ हजार ८१ रुपये इतकी आहे. याशिवाय सोनू घोरपडे यांच्या गोदामातून ५१ किलो मिल्क पावडर जप्त करण्यात आली असून तिची किंमत ७ हजार १७१ रुपये आहे.

मंचर येथील कारवाईत अटक करण्यात आलेल्या हेमंत कॉर्पोरेशनचे मालक हेमंत टेके यांच्या अकलूजमधील गोदामावर एफडीएच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणी दूध भेसळीसाठी वापरल्या जात असल्याचा संशय असलेल्या विविध प्रकारच्या पावडरचा मोठा साठा आढळून आला. प्राथमिक तपासात या पावडरचा वापर दुधातील एसएनएफ (SNF) वाढविणे, प्रथिनांचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढल्याचा भास निर्माण करणे तसेच प्रोटीन पावडरच्या स्वरूपात केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर त्यांचा प्रत्यक्ष वापर भेसळीसाठी होत होता का, हे स्पष्ट होणार आहे.

सांगली पोलिसांची मोठी कारवाई; २.१५ कोटींचा गांजा-कोकेन वैज्ञानिक पद्धतीने नष्ट

याच कारवाईदरम्यान माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथेही एफडीएने धाड टाकली. येथे ७ हजार ६३४ लिटर गाईचे दूध दर्जाहीन व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जागेवरच नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत ३ लाख ५ हजार ३६० रुपये इतकी आहे. तपासादरम्यान संबंधित डेअरीने दूध दर्जाहीन असल्याचे स्वीकारल्याचे कागदोपत्री पुरावेही अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत.

मंचर येथील दूध भेसळीच्या रॅकेटमध्ये अटक झालेल्या आरोपींमध्ये अकलूजचा हेमंत टेके याचाही समावेश आहे. त्यानंतर एफडीएचे विशेष पथक थेट अकलूजमध्ये दाखल झाले. काही दिवसांपूर्वी माळेवाडी येथील गोदाम बंद करून अकलूज येथील नामदेव मंगल कार्यालयाच्या पाठीमागे नवीन गोदाम सुरू करण्यात आले होते. याच ठिकाणी छापा टाकून एफडीएने दहा प्रकारच्या संशयित पावडरचा मोठा साठा जप्त केला.

दरम्यान, हेमंत टेके हा पावडर विक्री व्यवसायातील मोठा डीलर असून त्याच्याकडे या व्यवसायाचा वैध परवाना आहे. मात्र जप्त करण्यात आलेली पावडर प्रत्यक्षात दूध भेसळीसाठी वापरली जात होती का, हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली.

मुंढेंचा धडाका; सोलापूर यंत्रणा मात्र अनभिज्ञ?

या संपूर्ण कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दूध भेसळीच्या या साखळीचा धागा थेट सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचूनही स्थानिक प्रशासनाला त्याची पूर्वकल्पना नसल्याचे समोर आले. मंचर रॅकेटमध्ये अकलूजचे हेमंत टेके आणि पिलीवचे सोनू घोरपडे यांची नावे समोर आली असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल; ‘या’ नेत्याकडे आंदोलनाचे नेतृत्व

स्वतः आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माध्यमांशी बोलताना, ठाण्यातील एक व्यक्ती दूध भेसळीसाठी केमिकलचा पुरवठा करत होती, तर अकलूजचा हेमंत टेके हा पावडरचा मोठा पुरवठादार होता, असे स्पष्ट केले. मात्र अकलूजमध्ये कारवाई सुरू असताना सोलापूर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती नसल्याचे समोर आले. स्थानिक यंत्रणेने केवळ गोदाम सील करून पावडर जप्त करण्याची कारवाई केली.

राज्यात दूध भेसळीविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उघडलेल्या मोहिमेमुळे भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. मंचरपासून अकलूजपर्यंत उलगडत चाललेल्या या रॅकेटची मुळे आणखी किती खोलवर रुजली आहेत, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दूध भेसळीच्या या काळ्या साखळीवर एफडीएचा पुढचा वार कुठे होणार, याचीच चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

Web Title: Tukaram mundhe akluj milk adulteration raid powder seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • FDA
  • pune news
  • Solapur
  • Solapur News
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
1

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
2

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक
3

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस
4

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.