Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्रांतवाडी-धानोरी रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’; प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना सुरुचं

विश्रांतवाडी ते धानोरी आणि पुढे लोहगावला जोडणारा मुख्य रस्ता सध्या वाहनचालकांसाठी 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येमुळे या प्रमुख मार्गावरील रहदारीत प्रचंड वाढ झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2026 | 04:37 PM
विश्रांतवाडी-धानोरी रस्ता बनला 'मृत्यूचा सापळा'; प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना सुरुचं

विश्रांतवाडी-धानोरी रस्ता बनला 'मृत्यूचा सापळा'; प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना सुरुचं

Follow Us
Follow Us:

पुणे : विश्रांतवाडी ते धानोरी आणि पुढे लोहगावला जोडणारा मुख्य रस्ता सध्या वाहनचालकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येमुळे या प्रमुख मार्गावरील रहदारीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, रस्त्याची झालेली दुरवस्था आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेची कमालीची अनास्था यामुळे दररोज हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र आहे.

 

आंबानगरी सोसायटी ते धानोरी जकात नाक्यापर्यंतच्या अंतरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) उभारण्यात आले आहेत. मात्र, या गतिरोधकांवर रात्रीच्या वेळी चमकणारे पांढरे पट्टे (रिफ्लेक्टर पट्ट्या) मारण्यात आलेले नाहीत. परिणामी, रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही आणि वाहने जोरात आदळून गंभीर अपघात घडत आहेत. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी एका चारचाकी वाहनाचा येथे भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे.

रस्त्याच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या दुभाजकांवर (डिव्हायडर) दिशादर्शक किंवा रात्रीच्या वेळी चमकणारे रिफ्लेक्टर्स लावलेले नाहीत. रस्त्यावरील अपुऱ्या प्रकाशामुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना या दुभाजकांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे वाहने थेट दुभाजकांवर जाऊन आदळत आहेत. यामध्ये अनेक वाहनचालक जायबंदी झाले असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

हे सुद्धा वाचा : आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनातील आरोपींचे नातेवाईक टार्गेट; पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान

एमएनजीएलचे खोदकाम आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

‘एमएनजीएल’ (MNGL) गॅस पाईपलाईनच्या कामासाठी या मार्गावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खोदण्यात आला होता. हे काम होऊन आता एक महिना उलटून गेला तरी रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही. काही ठिकाणी केवळ डांबराचा थातुरमातूर लेप लावून काम उरकण्यात आले आहे, तर अनेक ठिकाणी खड्डे ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. या रस्त्यावरील राडारोड्यामुळे आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही चालणे असह्य झाले आहे.

“विश्रांतवाडी-धानोरी रस्त्यावरील गतिरोधक, रिफ्लेक्टर्स आणि खड्ड्यांच्या समस्यांबाबत आम्ही प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवेदने दिली आहेत. परंतु, ढिम्म प्रशासनाला अद्याप फरक पडलेला नाही. आता तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.” — गणेश पाटील (मनसे कार्यकर्ता व स्थानिक रहिवासी, धानोरी)

Web Title: Accidents are happening due to the poor condition of the road from vishrantwadi to dhanori

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Accident
  • pune news
  • Vishrantwadi

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
1

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू
2

अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण;  ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
3

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…
4

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.