Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वित्त अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; नेमकं प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात बोगस उपसूचनांच्या आधारे तरतुदींमध्ये फेरफार करून ठेकेदारांना ५२ कोटी रुपयांची देयके अदा केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2026 | 01:21 PM
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वित्त अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; नेमकं प्रकरण काय?

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वित्त अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात बोगस उपसूचनांच्या आधारे तरतुदींमध्ये फेरफार करून ठेकेदारांना ५२ कोटी रुपयांची देयके अदा केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी ही देयके बँकेतून रोखल्याची खोटी माहिती देऊन आयुक्तांचीही दिशाभूल केली, असा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट; वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर एकत्र पत्रकार परिषद

या प्रकरणावरून सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद आणि दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचे पाहून वरिष्ठ नेत्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र येण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

नेमका प्रकार काय?

सन २०२५-२६ चे सुधारित आणि २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक सादर करताना भाजप नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे काही बोगस उपसूचना घुसडण्यात आल्या. या उपसूचनांद्वारे तरतुदींमध्ये वाढ-घट करून ५२ कोटी रुपयांची रक्कम ठेकेदारांच्या खात्यावर जमा करण्यात आली. अभिषेक बारणे यांच्या मते, अर्थसंकल्पीय सभेत अशा कोणत्याही वर्गीकरणाच्या उपसूचना घेतल्या नव्हत्या. जैन यांनी कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता परस्पर ही प्रक्रिया राबवली. “जैन यांनी आयुक्तांना पैसे रोखल्याचे खोटे सांगितले, प्रत्यक्षात मात्र ५२ कोटी रुपये ठेकेदारांना दिले गेले आहेत,” असे बारणे यांनी नमूद केले.

दोषींची गय करणार नाही : सभागृह नेते

सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी प्रशासनाच्या या गैरकारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “प्रशासनाचा हा सावळागोंधळ आम्हीच शोधून काढला आहे. चुकीच्या कामांची गय केली जाणार नाही आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, पक्ष पूर्णपणे स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी आहे.”

हे सुद्धा वाचा : दादा शब्दाचे पक्के तर कामाचे एक्के होते, दादांच्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतोय; बारामतीकरांना सुनेत्रा पवारांसमोर अश्रू अनावर

चौकशी अंतिम टप्प्यात

महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार उपसूचनांना सभा किंवा समितीची मान्यता आवश्यक असते, मात्र येथे सर्व प्रक्रिया नियमबाह्य झाली आहे. प्रवीण जैन यांच्यासह या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाची चौकशी सध्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे.

बँक बदलणे आणि मागील तीन वर्षांतील कामकाजाच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त मुदत लागणार असल्याची माहिती चौकशी समितीचे सचिव तथा सहआयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.

Web Title: Action is likely to be taken against the finance officers of pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • BJP
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा
2

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई
3

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता
4

भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.