Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनचालकांच्या खिशाला बसणार फटका; पुण्यात ‘नो पार्किंग’वरील टोईंग कारवाई पुन्हा सुरू

पुणे शहरातील ‘नो पार्किंग’मध्ये उभी वाहने आता पुन्हा उचलली जाणार असून, पोलिसांकडून केली जाणारी टोईंग कारवाई तब्बल ६ महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 21, 2026 | 05:20 PM
वाहनचालकांच्या खिशाला बसणार फटका; पुण्यात ‘नो पार्किंग’वरील टोईंग कारवाई पुन्हा सुरू

वाहनचालकांच्या खिशाला बसणार फटका; पुण्यात ‘नो पार्किंग’वरील टोईंग कारवाई पुन्हा सुरू

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील ‘नो पार्किंग’मध्ये उभी वाहने आता पुन्हा उचलली जाणार असून, पोलिसांकडून केली जाणारी टोईंग कारवाई तब्बल ६ महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना अतिरीक्त शुल्क भरावे लागणार आहे. वाहन उचलण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा करार संपुष्टात आल्याने डिसेंबर २०२५ पासून ही कारवाई बंद होती. मात्र, नव्या निविदा प्रक्रियेला अद्याप अंतिम स्वरूप न मिळाल्याने राज्य सरकारने जुन्याच कंत्राटदाराला आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत पुन्हा वाहन उचलण्याची मोहीम सुरू झाली आहे.

 

पुण्याच्या वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. वाहन चालक त्रस्त आहेत. दुसरीकडे बेशिस्त वाहन चालकांमुळे या कोंडीत आणखीनच भर पडते. दरम्यान, पुणे पोलिसांकडून गेल्या ७ वर्षांपासून टोईंगद्वारे नो पार्किंगमधील वाहने उचलली जात होती. एका वाहनाला ७५६ रुपये दंड आकरला जात होता. मात्र, डिसेंबर २०२५ मध्ये ही कारवाई करार संपुष्टात आल्याने बंद झाला होता.

गेल्या ६ महिन्यांत टोईंग कारवाई बंद असल्याचा फायदा घेत अनेक वाहनचालकांनी प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा व व्यावसायिक भागांत सर्रास नियमबाह्य पार्किंग सुरू केले होते. परिणामी वाहतूक कोंडीत वाढ झाली होती. विशेषतः लक्ष्मी रोड, जंगली महाराज रस्ता, एफ.सी. रोड, कर्वे रोड, स्वारगेट, हडपसर, कोथरूड आणि कॅम्प परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

आता टोईंग कारवाई पुन्हा सुरू झाल्याने ‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभाणाऱ्या चालकांना दंडासह टोईंग शुल्क भरावे लागणार आहे. वाहन टोईंग झाल्यानंतर ते परत मिळवण्यासाठी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडे जाऊन दंडाची रक्कम तसेच वाहन उचलण्याचे शुल्क अदा करावे लागते. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’; रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक, ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?

वाहतूक पोलिसांच्या मते, रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणांपैकी एक आहेत. टोईंग कारवाई पुन्हा सुरू झाल्याने रस्ते मोकळे होण्यास मदत होईल आणि वाहतुकीचा वेग सुधारेल. दरम्यान, नागरिकांनी केवळ अधिकृत पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत, अन्यथा दंड आणि अतिरिक्त शुल्काला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे.

Web Title: Action will be taken against those parking vehicles in no parking zones in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • No Parking
  • Pune Traffic Police
  • Traffic News

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! पुणेकरांची ‘ई-चलन’ कारवाईपासून अखेर सुटका; आता फक्त वाहतूक नियमनच, कारवाईला ‘ब्रेक’
1

मोठी बातमी ! पुणेकरांची ‘ई-चलन’ कारवाईपासून अखेर सुटका; आता फक्त वाहतूक नियमनच, कारवाईला ‘ब्रेक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.