Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!

Nagpur News : नागपूर शहरातील अतिक्रमण हटविण्याची महापालिकेची कारवाई केवळ तात्पुरती ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. कारवाई केल्यानंतर अवघ्या काही तासांतच संबंधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत असल्याने रस्त्यांची परिस्थिती जैसे थे होत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, वाहतूक कोंडीचा त्रास नागपूरकरांना सहन करावा लागत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 16, 2026 | 01:58 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अतिक्रमणामुळे व्यपाऱ्यांची दुहेरी कोंडी
  • जबाबदारी निश्चित करण्याची गरज
  • सीताबर्डीतील कारवाईचा दावा हवेत
Nagpur News : शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाकडून सातत्याने मोहिमा जाहीर होत असल्या तरी प्रत्यक्ष परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. आयुक्तांनी शंभर दिवसांचे मिशन जाहीर केले, त्यानंतर प्रत्येक झोनने दररोज दहा किलोमीटर रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.

मात्र, या घोषणांनंतरही शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठा अतिक्रमणाच्या विळख्यातच आहेत. सणासुदीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यात रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या हातगाड्या, फुटपाथवर थाटलेली दुकाने आणि अनधिकृत विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी अधिकच तीव्र झाली आहे.

मनपाचे पथक कारवाई करून परतताच काही तासांतच हटविलेली दुकाने आणि हातगाड्‌या पुन्हा त्याच जागी उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. दररोज कारवाईचे फोटो आणि आकडे समोर येत असले तरी त्याचा परिणाम रस्त्यांवर दिसत नसल्याने अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

अतिक्रमणामुळे व्यपाऱ्यांची दुहेरी कोंडी

अतिक्रमणाचा फटका केवळ वाहतुकीलाच बसत नसून स्थानिक व्यापा-यांनाही मोठी किंमत मोजावी लागत आहे. ऑनलाइन खरेदी आणि ई-कॉमर्सच्या वाढत्या स्पर्धेमुळे आधीच अडचणीत असलेल्या पारंपरिक दुकानदारांसाठी रस्त्यांवरील अतिक्रमण आणखी एक संकट ठरत आहे. इतवारी, महाल, धरमपेठ, सदर आणि सेंट्रल एव्हेन्यूतील व्यापा-यांच्या मते, पार्किंगची अपुरी व्यवस्था आणि रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण यामुळे ग्राहक बाजारपेठेत येण्याचे टाळत आहेत.

जबाबदारी निश्चित करण्याची गरज

केवळ जप्ती करून किंवा अधूनमधून मोहीम राबवून अतिक्रमणाची समस्या सुटणार नाही. अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होऊ न देण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा मोहिमा केवळ कागदावरच सुरू राहतील आणि वाहतूक कोंडी अधिकच गंभीर होत जाईल.

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

सीताबर्डीतील कारवाईचा दावा हवेत

सीताबर्डी परिसरात मनपा प्रवर्तन विभागाने दिवसभर कारवाई करून मुख्य रस्ता, व्हरायटी चौक आणि मल्टी-लेव्हल पार्किंग परिसर अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा केला. मात्र, संध्याकाळ होताच या दाव्याची स्थिती स्पष्ट झाली. हटविण्यात आलेले विक्रेते पुन्हा रस्त्याच्या कडेला परतले.

महाल, मेडिकल चौक, खामला, देवनगर, धरमपेठ मार्केट, रामेश्वरी, मानेवाडा रोड आणि हनुमान नगर येथेही परिस्थिती फारशी वेगळी नाही. प्रशासनाने कारवाई पूर्ण झाल्याचे समाधान मानले; मात्र नागरिकांना त्याचा कोणताही फायदा झाला नाही. धरमपेठ आणि गोकुळपेठसारख्या प्रमुख व्यापारी भागांत तर फुटपाथच विक्रेत्यांच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे.

Web Title: Nagpur news is the anti encroachment drive merely a facade things returned to the status quo within just a few hours nagpur residents plagued by traffic congestioncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News
  • Traffic News

संबंधित बातम्या

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
1

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
2

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
4

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.