Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा

इंदापूर तालुक्यातील लाकडी, निरगुडे आणि म्हसोबाची वाडी परिसरात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे पिकांची अवस्था गंभीर झाली असून, तोंडाशी आलेला घास हातातून निसटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 27, 2026 | 12:30 AM
पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा

Follow Us
Follow Us:

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लाकडी, निरगुडे आणि म्हसोबाची वाडी परिसरात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे पिकांची अवस्था गंभीर झाली असून, तोंडाशी आलेला घास हातातून निसटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक ठिकाणी पिके जळून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (दि. २६) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी, निरगुडे आणि म्हसोबाची वाडी परिसरातील विविध शेतांमध्ये जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

 

पावसाच्या खंडामुळे पिकांची झालेली अवस्था, जमिनीतील घटलेली ओल, पिकांना बसलेला फटका तसेच संभाव्य उत्पादनातील घट याबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देत नुकसान झालेल्या पिकांचा प्रश्न मांडला. हातातोंडाशी आलेले पीक पावसाअभावी जळून गेल्याने उत्पादन खर्चही वसूल होणार नसल्याची चिंता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

‘शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव आहे; सरकार खंबीरपणे पाठीशी’

शेतकऱ्यांच्या जळालेल्या पिकांची अवस्था आणि त्यांच्या अडचणी पाहून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पिके जळाल्यामुळे हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांचे दुःख, त्यांची व्यथा आणि जळालेल्या पिकांची अवस्था पाहून परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. हे निसर्गनिर्मित संकट आहे. या संकटाला आपल्या सर्वांना सामोरे जावे लागेल; मात्र संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

२६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; इंदापूरचाही समावेश’

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करताना भरणे म्हणाले की, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये इंदापूर तालुक्याचाही समावेश आहे. त्यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या संकटात शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

मुख्यमंत्र्यांचे आभार; भरीव मदतीचा विश्वास

इंदापूर तालुक्याचा दुष्काळी परिस्थितीत समावेश झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगत भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. पावसातील खंडामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही निसर्गनिर्मित असल्याने या संकटाचा सामना सामूहिकपणे करावा लागणार आहे. मात्र, संकटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत आणि दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असे भरणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केल्याने शेतकऱ्यांच्या समस्या कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष परिस्थितीतून समजून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता पाहणीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत आणि शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ कितपत आणि किती वेगाने मिळतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Agriculture minister bharne has reviewed the crop damage suffered by farmers in indapur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Dattatray Bharne
  • Farmers
  • indapur news

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
3

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द
4

Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.