Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड

पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादामुळे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नव्या वादात सापडले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 11, 2026 | 05:56 PM
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड

Follow Us
Follow Us:
  • कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात
  • शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल
  • विरोधकांकडून टीकेची झोड
इंदापूर : पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादामुळे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नव्या वादात सापडले आहेत. भरणेवाडी येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्याला भेट नाकारल्याचा आरोप केला जात आहे.

 

व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित शेतकरी पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्याची मागणी करताना दिसतो. यावेळी शेतकरी आपली व्यथा मांडत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे “माझ्याकडे काही नाही तुमचं… मी साधा माणूस आहे… गरीब माणूस आहे… तुम्ही मोठी माणसं आहात…” असे म्हणत शेतकऱ्याच्या बोलण्याची नक्कल करत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर “तुम्ही मोठ्या माणसांचे ऐकून आंदोलन करता, ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडे जा,” असेही ते म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते.

दरम्यान, शेतकरी “मामा, तुम्ही सिंचन भवनमध्ये आम्हाला शब्द दिला होता,” असे सांगत आश्वासनाची आठवण करून देतो. त्यावर “मी तुम्हाला शब्द दिला नाही,” असे उत्तर मंत्री भरणे देताना दिसतात. तसेच “तुमचा आणि माझा काही शब्द नाही,” असेही ते म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यानंतर मंत्री भरणे वाहनात बसून तेथून निघून जातात.

हे सुद्धा वाचा : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

विशेष म्हणजे, २५ मे रोजी खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा शेतकरी करत आहेत. मात्र, त्यानंतरही पाणी न मिळाल्याने काही शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग

Web Title: Agriculture minister dattatray bharne is facing criticism from the opposition due to a viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Dattatray Bharne
  • Farmers
  • indapur news

संबंधित बातम्या

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया
1

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती
2

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
3

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही
4

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.