Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; पिकांमध्ये पाणीच पाणी, शेतकऱ्यांची धावपळ

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेनंतर झालेल्या अचानक पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला असला तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 01:47 PM
आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; पिकांमध्ये पाणीच पाणी, शेतकऱ्यांची धावपळ

आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; पिकांमध्ये पाणीच पाणी, शेतकऱ्यांची धावपळ

Follow Us
Follow Us:

मंचर : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अर्धा तास सर्वदूर पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा फटका शेती क्षेत्राला बसू लागला आहे. अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे तरकारी पिकांच्या सऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नव्याने लावलेल्या तसेच वाढीच्या अवस्थेतील रोपांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी शेतातून काढून देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेनंतर झालेल्या अचानक पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला असला तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. सऱ्यांमध्ये पाणी साचल्याने मुळांना हवा मिळण्यास अडथळा निर्माण होऊन रोपे पिवळी पडणे, कुजणे तसेच वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतात साचलेले पावसाचे पाणी काढून देताना शेतकऱ्यांची धावपळ झाली.

विशेषतः टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी यांसारख्या तरकारी पिकांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी शेतकरी पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करत आहेत. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस

तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतिट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

उकाड्यानंतर पावसाची हजेरी

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, मुंबई उपनगरातील काही भागांत शुक्रवारी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने उकाडा आणि वाढलेल्या उमसामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानासोबतच हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नागरिक अक्षरशः घामाघूम होत होते. अशा परिस्थितीत अचानक पडलेल्या हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

Maharashtra Weather : उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक

Web Title: Ambegaon taluka hit by unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Manchar News
  • Rain News

संबंधित बातम्या

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
1

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
2

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
3

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.