Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका

हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात कारवाई सुरू असताना महाकाय होर्डिंगचा भार न पेलल्याने क्रेन अचानक दुकानांवर कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2026 | 06:19 PM
लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका

लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटवताना क्रेन कोसळली; PMRDA च्या अवाजवी नियोजनाचा स्थानिकांना फटका

Follow Us
Follow Us:

पिंपरी :  नागरिकांच्या जिवाला धोका ठरणाऱ्या आणि परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्जवर अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हातोडा चालवला खरा; मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी या कारवाईला दुर्घटनेचे गालबोट लागले आहे. हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात कारवाई सुरू असताना महाकाय होर्डिंगचा भार न पेलल्याने शंभर फूट बूम बाहेर काढलेली क्रेन अचानक दुकानांवर कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची दुकाने आणि वाहनांचा चक्काचूर झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

गुरूवार (दि. ३० जुलै) आणि शुक्रवार (दि. ३१ जुलै) अशा दोन दिवसांत पीएमआरडीएच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हिंजवडीतील गट क्रमांक २६२ आणि २६३ मध्ये ही कारवाई राबवली. शुक्रवारी लक्ष्मी चौकात एक महाकाय अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे काम सुरू होते. होर्डिंगचा सांगाडा हवेत उचललेला असतानाच अचानक क्रेनचा जॅक फेल झाला आणि क्रेनचे संतुलन बिघडले. जवळपास १०० फूट बूम असलेली ही महाकाय क्रेन लगतच्या पत्राशेडच्या दुकानांवर जावून कोसळली. क्रेन पडताच परिसरात एकच पळापळ आणि अफरा-तफरी माजली.

काय झाले नुकसान?

दुकाने : ३ दुकानांचा (पत्राशेड) अक्षरशः चक्काचूर.

वाहने : १ टेम्पो आणि १ दुचाकी पूर्णपणे क्रॅश.

सहानुभूतीची गरज : पादचारी व स्थानिक वेळीच बाजूला सरकल्याने अनर्थ टळला; परंतु गोरगरीब दुकानदारांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले.

८ पैकी ६ होर्डिंग्ज मालकांनीच हटवले

लक्ष्मी चौकात पीएमआरडीएच्या पाहणीत एकूण ८ महाकाय अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले होते. प्रशासनाने कारवाईचा थेट इशारा दिल्यानंतर, कारवाईच्या धास्तीने संबंधित फलकधारकांनी स्वतःहून ६ होर्डिंग्ज रातोरात काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. उर्वरित २ होर्डिंग्ज पाडण्यासाठी आलेल्या पथकाला दोन दिवसांत केवळ ते दोन होर्डिंग्ज पाडता आले आणि त्यातही क्रेन कोसळण्याची नामुष्की ओढवली.

‘लक्ष्मी चौक मोकळा श्वास कधी घेणार?’

आयटी पार्कचे प्रवेशद्वार असलेल्या लक्ष्मी चौकात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा आणि फुटपाथवर उभारलेली शेकडो अनधिकृत दुकाने, पत्राशेड्स आणि अन्नपदार्थांच्या गाड्या आहेत. अनधिकृत होर्डिंग्जवर तुटपुंजी कारवाई करणाऱ्या पीएमआरडीएला ही रहदारीला अडथळा ठरणारी पत्राशेड्स आणि अनधिकृत दुकाने का दिसत नाहीत? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.

हे सुद्धा वाचा : ऑनलाइन शंभर मित्र, पण ‘जिवलग’ किती? तरुणाईच्या नजरेतून डिजिटल मैत्रीचा नवा चेहरा

नुकसानभरपाई कोण देणार? पीडित व्यापारी वाऱ्यावर!

दुर्घटनेत पत्राशेड, टेम्पो आणि दुचाकीचे नुकसान झालेल्या लहान व्यावसायिकांना आता रोजच्या पोटापाण्याची चिंता भेडसावत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा सवाल बाधित व्यावसायिक विचारत आहेत; मात्र पीएमआरडीएकडून यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण अथवा मदतीचे आश्वासन दिलेले नाही.

Web Title: An incident occurred where a crane collapsed while an unauthorized hoarding was being removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Accident News
  • PMRDA
  • pune news

संबंधित बातम्या

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
1

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
4

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.