Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणता झेंडा घेऊ हाती? काका-पुतण्याच्या लढतीमुळे बारामतीकर पुन्हा पेचात, राज्याला लागली उत्सुकता

बारामतीच्या लढाईत कौटुंबिक राजकीय लढाई महाराष्ट्रासह आता देशात चर्चेत येणार आहे. लोकसभा निवडणुकी वेळी पवार साहेबांचा सन्मान जपला, आता विधानसभा निवडणुकीमध्ये दादांचा बारामतीकर सन्मान जपणार का असा सवाल व्यक्त केला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 25, 2024 | 09:56 PM
कोणता झेंडा घेऊ हाती? काका-पुतण्याच्या लढतीमुळे बारामतीकर पुन्हा पेचात, राज्याला लागली उत्सुकता

कोणता झेंडा घेऊ हाती? काका-पुतण्याच्या लढतीमुळे बारामतीकर पुन्हा पेचात, राज्याला लागली उत्सुकता

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : बारामती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याने आता बारामतीत मुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका विरुद्ध पुतण्या लढत होणार आहे. कुटुंबातील या राजकीय लढाईमुळे कोणता झेंडा घेऊ हाती?, अशी अवस्था बारामतीकरांची झाली आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बारामतीकरांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सन्मान जपला, आता विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान बारामतीकर जपणार का?, याची उत्सुकता राज्याला लागली आहे.

लोकसभा निवडणुकी वेळी बारामतीतील मतदारांनी लोकसभेला “ताई” तर विधानसभेला ” दादा” अशी भूमिका अनेक माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा सन्मान जपत बारामतीकरांनी खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून ४८ हजारांचे मताधिक्य दिले. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे बारामती विधानसभेसाठी सुरुवातीला निवडणूक न लढवण्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले होते. मात्र कार्यकर्त्यांनी पत्रांद्वारे तसेच त्यांचा ताफा अडवून विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवावी, असा आग्रह धरला. अजित पवार यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत जोरदार मोर्चे बांधणी करून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचे मोठे काम बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ सर्वाधिक महिलांना मिळण्यासाठी सुरुवातीपासूनच स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मोठे मेळावे बारामती मध्ये आयोजित करून उपमुख्यमंत्री पवार यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केले होते. दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यात स्वाभिमानी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊनही बारामती विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांचे नाव जाहीर होत नसल्याने ऐनवेळी शरद पवार दुसरा उमेदवार देतात की काय, असा सवाल व्यक्त केला जात होता. युगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आता बारामतीच्या रणांगणामध्ये पवार विरुद्ध पवार अशी काका पुतण्यांची लढत होणार आहे. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात राज्यसभा सदस्य व अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांचा मेळावा आयोजित करून त्यांच्याशी संवाद साधला. या मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून बारामती शहरासह तालुक्यात विविध महिलांचे मेळावे आयोजित करण्यात आले. युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून देखील कार्यकर्ते मेळावे, महिला मेळावे घेण्यात आले. सध्या युगेंद्र पवार तालुक्यातील विविध गावातील वाड्यावर असताना भेट देऊन जनतेशी संवाद साधत आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार व पदाधिकारी घोंगडी बैठका आयोजित करून प्रचारात सक्रिय झाले आहेत.

बारामतीच्या रणांगणात कौटुंबिक राजकीय लढाई महाराष्ट्रासह आता देशात चर्चेत येणार आहे. लोकसभा निवडणुकी वेळी पवार साहेबांचा सन्मान जपला, आता विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीकर सन्मान जपणार का असा सवाल व्यक्त केला जात आहे. दरम्यान बहुतांश मतदार आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, यामध्ये अनेक मतदार “दोन्ही नेते आपलेच!”असे स्पष्टीकरण देत विधानसभा निवडणुकीतील मनातील नेता कोण?, याबाबत मात्र मौन बाळगत आहेत. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पाच वर्षात साडेआठ हजार कोटी रुपयांहून अधिक विकास कामे आणली आहेत , ही त्यांच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. तर युगेंद्र पवार जरी नवखे उमेदवार असले तरी त्यांच्या पाठीमागे शरद पवार यांची ताकद आहे. मात्र या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा लढतीने न पाहता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशा लढतीने पाहिल्यास अजित पवार यांनाच फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या कोणता झेंडा घेऊ हाती ? अशी मनस्थिती बारामती मध्ये अनेकांची झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Web Title: Baramati assembly ajit pawar vs yugendra pawar fight for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 09:55 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Maharashtra Assembly election 2024
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ
1

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी
2

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?
3

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला वेग; सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला शेळके यांचा पाठिंबा
4

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला वेग; सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला शेळके यांचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.