Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

कार्यक्रमसाठी लावलेला पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो नसल्याचे दिसले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 06:21 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • तटकरे यांच्या मतदारसंघांतील कार्यक्रमाची जोरदार चर्चा
  • कार्यक्रमाच्या पोस्टरवर अजित पवारांचा फोटोच नाही
  • अमोल मिटकरींचा संताप, दिला थेट इशारा
Amol Mitkari on Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघांमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाला सुनील तटकरे यांच्या सोबतच मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात स्टेजवर लावलेल्या बॅनरवरची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमसाठी लावलेला पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो नसल्याचे दिसते आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय असं मिटकरी म्हणालेत.

Sanjay Raut On Ashok Kharat : “अशोक खरातांच्या पाठीशी सरकार…”, संजय राऊतांच्या आरोपांनंतर राजकारणात खळबळ

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करु नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, प्रोटोकॉल असं ट्वीट करत अमोल मटकरी यांनी नाव न घेता सुनिल तटकरे यांना टोला लगावलाय. खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाात स्वतः सुनिल तटकरे, मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या, सध्या या कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच्या पेक्षा चर्चा आहे ती म्हणजे या कार्यक्रमावेळी स्टेजवर लावलेल्या बॅनरची. स्टेजवर लावलेल्या पोस्टरमध्ये सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचेच फोटो लावण्यात आले होते. यात पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार यांच्यापैकी कोणाचाच फोटो नव्हताय त्यामुळे सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. या सगळ्या परिस्थितीवरुन आमदार अमोल मिटकरींनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय असं म्हणत त्यांनी थेट टोला लगावला आहे.

“ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही.राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये.महाराष्ट्र हे सहन करणार नाही”.#प्रोटोकॉल pic.twitter.com/zrXuvOxvnu — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 29, 2026

ट्वीटमध्ये काय?

‘ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही’ असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ‘राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करु नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही’, असं म्हणत त्यांनी हॅशटॅग प्रोटोकॉल असा लिहीत ट्वीट केलं आहे. या सगळ्या परिस्थितीत अमोल मटकरी यांनी नाव न घेता सुनिल तटकरे यांना टोला लगावला आहे.

बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमावरुन संताप व्यक्त होत आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने सगळीकडे वातावरण तापलं आहे. तटकरे कुटुंबियांविरोधात जोरदार टीकास्त्र सोडली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासह इतर पक्षांच्या देखील सुनील तटकरे निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता राजकारणात कोणतं वळण येणार हे पहावं लागेल.

राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन

Web Title: Amol mitkari on ncp sunil tatkare news amol mitkari reaction regarding the flex banners displayed at the ncp event in raigad marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ajit Pawar NCP
  • amol mitkari
  • Sunetra Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
1

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Sunetra Pawar News: राष्ट्रवादीच्या नगसेवकांना निधी वाटपात भेदभाव, सुनेत्रा पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाल्या…
2

Sunetra Pawar News: राष्ट्रवादीच्या नगसेवकांना निधी वाटपात भेदभाव, सुनेत्रा पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाल्या…

NCP Politics:  सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती
3

NCP Politics: सुनेत्रा पवारांनी मारले एका दगडात तीन पक्षी! राष्ट्रवादीच्या आर्थिक सत्तेचे केंद्र आता पवार माय-लेकांच्या हाती

NCP Politics: ‘आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?’; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याने खळबळ
4

NCP Politics: ‘आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?’; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.