Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांकडून सातत्याने केला जात आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 30, 2026 | 12:58 PM
NCP Banner Controversy: अजित पवारांचे फोटो बॅनर्सवरून गायब! बॅनर वॉरमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी
Follow Us
Close
Follow Us:

 

  • रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातून बॅनरवरून पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब
  • ‘७/१२’ वरून टोला: या प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा
  • “ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांना डावलून स्वतः देव बनण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सहन करणार नाही,” अमोल मिटकरी  त्यांनी तटकरेंवर अप्रत्यक्ष टीका
 

Ajit Pawar Photo Missing from party banner: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांवर पक्ष हायजॅक करण्याचे सातत्याने आरोप होत आहेत. या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. अशातच रायगडमधील एका कार्यक्रमातील बॅनर चर्चेत आले आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. पण या कार्यक्रमातील बॅनर्सवर उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे फोटोच लावण्यात आले नाहीत. या मुद्द्यावर पक्षाचे नेते अमोल मिटकरी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या सत्कार सोहळ्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्यांच्या कन्या आणि मंत्री आदिती तटकरे, पुत्र अनिकेत तटकरे हेदेखील उपस्थित होते. पण या कार्यक्रमातील बॅनर्सवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे मात्र फोटो गायब असल्याचे दिसून आले. यावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

राज्यातील शाळांसाठी ‘या’ तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर; 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार

यामुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचा फोटो ट्विटर एक्सवर पोस्ट करत तटकरेंवर थेट हल्लाबोल केला आहे. ” मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा ७/१२ स्वत:च्या नावे करतो, याचं हे जिवंत उदाहरण… जे आम्ही वारंवार बोलत आहोत.”

अमोल मिटकरींचीही टीका

दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विटर एक्सवर पोस्ट करत तटकरेंवर अप्रत्यक्ष टिका केली आहे. “ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही.राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही.”

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांकडून सातत्याने केला जात आहे. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या मुद्द्यावरून सुनील तटकरे हे राष्ट्रवाीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर आले होते. त्यातच राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्याने तटकर पुन्हा एकदा निशाण्यावर आले आहे.

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया

दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अदिती तटकरे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी फेसबुवर पोस्ट शेअर करतृ आपली भूमिका मांडली आहे.”स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.
अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये.

तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच.
धन्यवाद!”

Web Title: Aditi and sunil tatkare attend event without ajit pawars visuals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Raigad News
  • rohit pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Sunil Shelke News: रोहित पवारांनी ‘भविष्यवाणीचा’ धंदा सुरू केलाय का? सुनील शेळके यांचा जळजळीत सवाल
1

Sunil Shelke News: रोहित पवारांनी ‘भविष्यवाणीचा’ धंदा सुरू केलाय का? सुनील शेळके यांचा जळजळीत सवाल

NCP Politics: ‘आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?’; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याने खळबळ
2

NCP Politics: ‘आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?’; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याने खळबळ

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!
3

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
4

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.