Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला वेग; सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला शेळके यांचा पाठिंबा

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सूचक वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 29, 2026 | 02:15 PM
MLA Sunil Shelke on Both ncp come together after ajit pawar death maval news

MLA Sunil Shelke on Both ncp come together after ajit pawar death maval news

Follow Us
Follow Us:

Political News : वडगाव मावळ : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली  आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी महत्त्वपूर्ण विधान करत पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, अजित दादांच्या निधनानंतर पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. दादांनी याबाबत सर्वांशी सविस्तर चर्चा केली नव्हती, मात्र सध्याच्या परिस्थितीत पक्षाच्या भविष्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे सूचक वक्तव्य आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. आमदार सुनील शेळके म्हणाले की, “दादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात पक्ष वाढत असेल, तर तो आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. पक्षाचे हित लक्षात घेऊन सर्वांनी सकारात्मकतेने निर्णय घ्यावा,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच, “ज्यांना सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य नसेल, त्यांनी पक्ष सोडण्याचा पर्याय निवडू शकतात,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

हे देखील वाचा : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन

अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून न निघाल्याची भावना व्यक्त करताना शेळके म्हणाले, “दैनंदिन कामकाज करताना दादांची उणीव पावलोपावली जाणवते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती मिळाली होती.”

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास व्यक्त केला. “या घटनेमागील सत्य मुख्यमंत्री लवकरच जनतेसमोर आणतील,” असे ते म्हणाले. मावळ तालुक्याच्या विकासाचा उल्लेख करताना शेळके यांनी सांगितले की, दादांच्या काळात अनेक प्रकल्पांना निधी मिळत होता. “संत तुकाराम महाराजांच्या पांढऱ्या डोंगराच्या पायथ्याशी सुमारे १२ ते १४ कोटी रुपयांचा कॉरिडॉर उभारण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. आगामी काळात हे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

हे देखील वाचा :  उन्हाचा कडाका वाढत असतानाच पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज

एकूणच, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर निर्माण झालेल्या परिस्थितीत विलीनीकरणाचा पर्याय अधिक मजबूत होत असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकसंघ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

 

Web Title: Mla sunil shelke on both ncp come together after ajit pawar death maval news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maval Politics
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा
1

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
2

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
3

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.